सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त जुना पुना नाका येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास व कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सभागृह नेते श्रीनिवास करली,विरोधी पक्षनेते अमोल बापू शिंदे,गटनेते आनंद चंदनशिवे,मंडई व उद्यान सभापती गणेश पुजारी,नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर,अमोल कदम,योगेश पवार,समीर मुजावर, महेश खुर्द,बाबलू कोकाटे, विजय शिंदे,सुनील भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Comments