सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्रीसंत वीरशैव कक्कया महाराज जयंती दिनानिमित्त व महाशिवरात्रि दिनी शिवभक्त बेडर काणप्पा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन.
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने श्रीसंत वीरशैव कक्कया महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त व महाशिवरात्रि दिनी बेडर समाजाचे आराध्य दैवत शिवभक्त बेडर काणप्पा यांच्या जयंतीनिमित्त कौन्सिल हॉल येथील महापौर यांच्या कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी सभागृह नेते श्रीनिवास करली,विरोधी पक्षनेते अमोल शिंदे,गटनेते आनंद चंदनशिवे,मंडई व उद्यान सभापती गणेश पुजारी,नगरसेवक गुरूशांत धुत्तरगावकर,तिप्पण्णा इंगळे, अशोक सदाफुले, लक्ष्मण अवसरे,नंदू खारटमल, सतीश माने,राजेश झंपले, विनोद माने आदी मान्यवर उपस्थित होते
0 Comments