…‘असीमनं माफी मागायला नकार दिला’ !
तीन महिन्यांसाठीच सनद रद्द झालीय ना? फिकीर नॉट. किरकोळ आहे हे. सगळ्यात भारी गोष्ट कायाय माहितीय का?…‘असीमनं माफी मागायला नकार दिला’ !
हे लै भारी झालं. आपण छत्रपती शिवरायांची निधडी छाती आणि विश्वरत्न भीमरायाची जिगरबाज वृत्ती अंगी बाणलेले छावे आहोत. माफी मागणं हे पळपुट्यांच्या पिलावळीचे धंदे, आपले नाही. वेल डन असीम.
गंमत बघा, सरन्यायाधीशांना बूट फेकून मारणारा वकील मजेत आहे… ‘फालतू’ सत्ताधीशांना आव्हान देणाऱ्या नीडर बाणेदार वकीलाची सनद मात्र रद्द होते !  असुद्या... आपण रोज सांगतोय, "अराजक माजलंय, देश धुमसतोय, हुकूमशाही आहे, दडपशाही आणि झुंडशाहीचा नंगानाच सुरू आहे..." हे अजूनही ज्या बधीरांना पटत नाही, त्यांना जागे करणारे हे छोटेछोटे 'अलार्म' आहेत.
मतचोरी करून संविधानावर दरोडा घालणाऱ्या नराधमांचा थयथयाट सुरू असताना पाठीचा कणा ताठ ठेऊन अजस्त्र हिंस्त्र क्रूर सत्तेला ललकारण्यात जे सुख आहे, त्यापुढं अशा भेकड कारवाया अत्यंत 'फालतू' आहेत. 
मला राग एकाच गोष्टीचा आहे की महात्मा फुले आणि सावित्रीबाईंविषयी अत्यंत किळसवाणी भाषा वापरणार्या भिकारचोटाला असीमनं 'फालतू' हा सौम्य शब्द वापरला. महामानवांचा अवमान करणार्या हरामखोरांसाठी आमच्या सातारी-कोल्हापुरी भाषेत याहून खतरनाक शब्द आहेत. असो.असीम, या फोटोतला जो दिवस आहे ना... तेव्हापासून या अजस्त्र, हिंस्त्र शक्तीबरोबर आपण लढतोय. त्या दिवसापासून रोज मी त्यांच्या पिलावळीला ठोकून फाडून टाकताना सगळा महाराष्ट्र बघतोय. तू ही तेच करतोयस. याही वेळी आपण सोबत आहोत. लढायचं... आणि जिंकायचं.
जय शिवराय... जय भीम.
- किरण माने.
(किरण माने यांच्या फेसबुक पेज वरून)
.jpg)
0 Comments