Hot Posts

6/recent/ticker-posts

शहर गुन्हे शाखेकडून ०१,०८,०००/- रू. किंमतीचा ३६ ग्रॅम Mephedrone (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त.

 शहर गुन्हे शाखेकडून ०१,०८,०००/- रू. किंमतीचा ३६ ग्रॅम

Mephedrone (एम.डी.) अंमली पदार्थ जप्त.

सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर शहरामध्ये अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणाऱ्या इसमांचा शोध घेवून त्यांचेवर कठोर कारवाई करणेबाबतएम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्वीनी पाटील, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, सोलापूर शहर यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनामार्गदर्शन करून आवश्यक त्या सुचना दिल्या होत्या.त्याअनुषंगाने, दिनांक २८/१०/२०२५ रोजी गुन्हे शाखेकडील नेमणूकीस असलेले ग्रेडपोसई शामकांत जाधव, पोह/बापु साठे व त्यांचे तपास पथक अवैध अंमली पदार्थ खरेदी-विक्री करणारे इसमांवर कारवाई करणेकरीता शहर हद्दित पेट्रालिंग करीत असताना त्यांना गोपनिय बातमी प्राप्त झाली की, " एक इसम सोलापूर एस.टी.स्टँड परिसरामध्ये Mephedrone (एम.डी.) अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी येणार आहे". प्राप्त बातमी अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना अवगत करून त्यांचे सूचनेप्रमाणे व मार्गदर्शनाखाली ग्रेपोसई शामकांत जाधव व तपास पथक असे सोलापूर एस.टी. स्टँड परिसरामध्ये गेले. त्या ठिकाणी त्यांनी प्राप्त बातमीचे अनुषंगाने पाहणी केली असता एक इसम संशयास्पद स्थितीत थांबल्याचे दिसून आले. त्यावेळी त्यास शिताफीने ताब्यात घेवून त्याचे नाव-पत्ता विचारून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे पँटचे खिशामध्ये एका प्लास्टीक पाऊचमध्ये पांढऱ्या रंगाची Mephedrone (एम.डी.) सदृश्य पावडर मिळून आली. म्हणून तात्काळ पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर कडील फॉरेन्सिक टिमला पाचारण करून सदर पावडरची रासायनीक तपासणी केली असता सदरची पावडर ही Mephedrone (एम.डी.) अंमली पदार्थ असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून नमूद इसम नामे- मोहमद अझहर हैदरसाहेब कुरेशी, वय ३७ वर्षे रा.१३३८/३ भिमपुरा लेन, सेंटर स्ट्रीट कॅम्प, पुणे यास ताब्यात घेवून त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने Mephedrone (एम.डी.) अंमली पदार्थ सोलापूर शहरामध्ये विक्री करीता घेवून आल्याचे सांगितले. त्यानंतर नमूद इसमाविरूध्द फौजदार चावडी पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे गुरनं ७५२/२०२५ एन.डी.पी.एस. अॅक्ट कलम ८ (क), २२ (ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडील सहा. पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे हे करीत आहेत. तपासामध्ये आरोपी नामे- मोहमद अझहर हैदरसाहेब कुरेशी याने सदरचा अंमली पदार्थ हा मुंबई येथून घेवून आल्याचे निष्पन्न झाले असून त्या दृष्टीने पुढील तपास / कारवाई चालू आहे. सदरची कामगिरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉ. अश्वीनी पाटील, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे /वि.शा.), राजन माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली अरविंद माने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, स.पो.नि. दत्तात्रय काळे, ग्रे.पो.स. ई. शामकांत जाधव व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार बापू साठे, सैपन सय्यद, वसिम शेख, सुभाष मुंढे, अनिल जाधव, कुमार शेळके, मच्छिंद्र राठोड व प्रकाश गायकवाड यांनी केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments