दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतर जिल्हा टोळीचे 04 सराईत
गुन्हेगार शहर गुन्हे शाखेकडुन जेरबंद
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-दिनांक 25/10/2025 रोजी दुपारी 02.30 वा. ते सायकाळी 06.00 वा. चे दरम्यान गोंविदश्री मंगल कार्यालय, जुळे सोलापुर येथे बंद घरात कोणीही नसल्याचा फायदा घेवुन घराचे कुलूप तोडुन घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी झालेबाबत फिर्यादी - गौतम मारुती गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरुन विजापुर नाका पोलीस स्टेशन, सोलापुर शहर येथे गु.र.नं. 511/2025, भारतीय न्याय संहिता कलम 331 (3), 305(A) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
तसेच दिनांक 25/10/2025 रोजी दुपारी 03.00 वा. चे दरम्यान कोणार्क नगर, जुळे सोलापुर येथे देखील बंद घराचे कुलूंप तोडुन सोन्याचे दागिणे चोरी झालेबाबत विजापुर नाका पोलीस स्टेशन, सोलापुर शहर येथे गुरनं.512/2025, भारतीय न्याय संहिता कलम 331 (3), 331 (4), 305 (A) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदरचे दोन्ही गुन्हे हे उघडकीस आणुन मुद्देमाल हस्तगत करणेबाबत एम राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. अश्विनी पाटील पोलीस उप आयुक्त (गुन्हे / विशा), राजन माने, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शनपर सुचना दिल्या होत्या.
वरील नमुद दिवसा घरफोडीच्या घटना घडल्याने, नमुद दोन्ही घटनांचे गांर्भिय ओळखुन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखेकडील सपोनि / विजय पाटील व त्यांचे पथक यांनी घटनास्थळी भेट दिली. सपोनि पाटील व त्यांचे तपास पथकाने सोलापूर शहरातील वेगवेगळया ठिकाणचे सी. सी. टी. व्ही फुटेजची बारकाईने पाहणी करुन व तांत्रीक विश्लेषणाचे आधारे यातील चार आरोपीची ओळख पटवली.
त्यानंतर दिनांक 29/10/2025 रोजी रात्रौ 12.00 वा. चे सुमारास सपोनि / विजय पाटील व त्यांचे तपास पथकास खात्रीशीर बातमी मिळाली की, चार इसम हे जुना पुना नाका परिसरात संशयीतरित्या फिरत आहेत. सदर बातमीची शहानिशा करुन कारवाई करणेकामी सपोनि विजय पाटील व त्यांचे तपास पथकाने सदर ठिकाणी जावुन जुना पुना नाक्याजवळील आकांक्षा टुर्स ट्रॅव्हल्स जवळ, सोलापूर येथून 04 इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्याचे नाव पत्ता विचारले असता, त्यांनी त्यांची नावे - (01) शेरअली मोती सय्यद, वय 25 वर्ष, रा. भोसा रोड, इंदीरा नगर, मशिदजवळ, जि. यवतमाळ (2) प्रसन्न प्रमोद मेश्राम, वय - 24 वर्ष, रा. डी. एङ कॉलेज, भोसा रोड, जि. यवतमाळ (3) चंदु हिरा भतकल, वय-39 वर्ष, रा. बोरगांव, मेघे टेकडी, जि.वर्धा, (4) रोशन पुरुषोत्तम प्रधान, वय- 27 वर्ष, रा. सुराना ले-आउट, अंबिका नगर, जि. यवतमाळ असे असल्याचे सांगितले. नमुद इसमांची अंगझडती घेतली असता, त्यांचे ताब्यातुन वरील नमुद दोन गुन्हयातील 10 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 15 हजार रुपये रोख रक्कम असा एकुण 1,19,000/- रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, आरोपींना मा. न्यायालयासमोर हजर केले असता, मा. न्यायालयाने आरोपींना पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर आरोपींबाबत अधिक तपास केला असता, सदरचे चारही आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द यापुर्वी यवतमाळ, चंद्रपुर या जिल्ह्यांमध्ये खुन, चोरी, घरफोडी व दरोड्याचे गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी नामे-शेरअली मोती सय्यद याचे विरुध्द यवतमाळ शहर पोलीस ठाणे, यवतमाळ येथे खुनाचा व मोक्का कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
सदरची कामगिरी एम राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ अश्विनी पाटील, पोलीस उप- आयुक्त गुन्हे, राजन माने, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि / विजय पाटील व पोलीस अंमलदार- जावीद जमादार, महेश शिंदे, अनिल जाधव, धिरज सातपुते, आबाजी सावळे, विठ्ठल यलमार, राजु मुदगल तसेच सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे.


0 Comments