शेतकरी कर्जमाफीसाठी नागपुरात ‘महाएल्गार’;
बच्चू कडूंसोबत जरांगे पाटीलही आंदोलनस्थळी!
नागपूर (कटूसत्य वृत्त):- राज्यभरातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी आज नागपुरात मोठं ‘महाएल्गार आंदोलन’ पेटलं आहे. या आंदोलनाचं नेतृत्व प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू तसेच विविध शेतकरी संघटनांचे नेते करत आहेत.
शेतकऱ्यांच्या वाढत्या कर्जबाजारीपणामुळे आणि शासनाच्या निष्क्रिय भूमिकेमुळे हे आंदोलन उफाळून आलं आहे.बच्चू कडू यांनी आंदोलनातून सरकारला थेट इशारा देताना म्हणाले की,“शेतकऱ्यांचा संयम संपत चाललाय; आता न्याय मिळाला नाही, तर महाराष्ट्रभर रस्त्यावर उतरू!”
दरम्यान, मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आज नागपुरात आंदोलनस्थळी येऊन शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यांनी बच्चू कडू यांच्याशी चर्चा केली आणि शेतकरी आंदोलनाला आपला थेट पाठींबा जाहीर केला.जरांगे पाटील म्हणाले “शेतकरी आणि मराठा समाज या दोघांवरही अन्याय होत आहे. सरकारने तातडीने निर्णय घेतला नाही,
तर या जनतेचा संताप अनावर होईल.”
नागपुरात आज शेतकरी, कामगार, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले असूनशासनाविरोधी घोषणांनी परिसर दणाणून गेला आहे.राज्य सरकारकडून अजूनही ठोस प्रतिसाद न मिळाल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

0 Comments