Hot Posts

6/recent/ticker-posts

पक्षीमित्र संमेलनाच्या बोधचिन्ह प्रतिमेचे आनावरण

 पक्षीमित्र संमेलनाच्या  बोधचिन्ह प्रतिमेचे आनावरण


 सोलापूर  (कटुसत्य वृत्त ) :-  34 व्या पक्षीमित्र संमेलनाच्या बोधचिन्हाचे आज उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. 10 आणि 11 एप्रिल 2021 रोजी होण्याऱ्या या संमेलनाचे बोधचिन्ह सापमार गरुड पक्षी आहे.

            उपवनसंरक्षक धैर्यशील पाटील यांच्या हस्ते आज सापमार गरुड पक्ष्याच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. उपवनसंरक्षक कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास विभागीय वनाधिकारी सुवर्णा माने, नियोजित संमेलनाध्यक्ष प्रा. निनाद शहा, डॉ. व्यंकटेश मेतन आदी उपस्थित होते.

            महाराष्ट्र वन विभाग, सामाजिक वनीकरण आणि डॉ. मेतन फाउंडेशनच्या वतीने या संमेलनाचे संयोजन करण्यात येत आहे. सापमार गरुड पक्षी सोलापूर जिल्ह्यातील माळरानावर आढळतो. ‘माळरान-शिकारी पक्षी संवर्धन’ अशी या संमेलनाची संकल्पना आहे.

            पक्षीमित्र संमेलनाचे संयोजन यशस्वी करण्याबाबतही आजच्या बैठकीत चर्चा झाली. यावेळी  प्रा.रश्मी माने, अनिल जोशी, प्रा. धनंजय शहा, सोमशेखर लवंगे, चिदानंद मुस्तारे, विनोद कामतेकर आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments