Hot Posts

6/recent/ticker-posts

“फलटणच्या डॉक्टरचा मृत्यू, पण भाजपातल्या महिला नेत्या गप्प का?”

 “फलटणच्या डॉक्टरचा मृत्यू, पण भाजपातल्या महिला नेत्या गप्प का?”

सोलापूर (कटूसत्य विशेष वृत्त) :- फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांच्या संशयास्पद मृत्यूनं राज्य हादरलं आहे. वैद्यकीय सेवेत असलेल्या एका संवेदनशील, कर्तबगार महिलेचा मृत्यू तोही पोलिस अधिकाऱ्यांच्या मानसिक छळामुळे हा केवळ आत्महत्येचा प्रसंग नाही, तर तो महाराष्ट्रातील स्त्रीसुरक्षेच्या अपयशाचा आरसा आहे.

मात्र, आश्चर्य म्हणजे या घटनेवर भाजपातील एकाही महिला नेत्या बोलल्या नाहीत!ज्या पक्षाच्या महिला नेत्यांनी प्रत्येक वेळी “बेटी बचाओ”चे फलक हातात घेतले, “महिला सक्षमीकरण”चे भाषण केले, त्या सगळ्या आज शांत आहेत.

का गप्प आहेत भाजपातील महिला नेत्या?

एक महिला डॉक्टर संपली, तिच्या आत्महत्येच्या मागे पोलिस यंत्रणेचा छळ असल्याचे आरोप आहेत. पण सत्ता पक्षातील एकाही नेत्याच्या तोंडून एक शब्द नाही.ना संवेदना, ना निषेध, ना आंदोलन!त्या डॉक्टरचं काय चुकलं होतं?

ती भाजपची कार्यकर्ती नव्हती म्हणून का तिच्या वेदनेला आवाज नाही?महिलांच्या सुरक्षेवर मोठमोठ्या गप्पा, पण कृती कुठे?मुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीसांच्या राज्यात, एका महिला डॉक्टरला न्याय मिळावा म्हणून रस्त्यावर उतरावं लागतं. हा महाराष्ट्राचा लाजिरवाणा क्षण आहे.“महिलांचा सन्मान” हा केवळ पोस्टरवरील घोषवाक्य राहिला आहे का?भाजपच्या महिला मोर्च्याला ही घटना दिसत नाही का?

जनतेचा प्रश्न सरळ आणि टोकदार आहे:

 डॉ. संपदा मुंडे तुमच्यासाठी फक्त एक आकडा आहे का? सत्तेच्या सुखात एवढं बधिर होणं योग्य आहे का? एक महिला डॉक्टर अन्यायाला बळी पडली, आणि महिला नेत्या गप्प हेच का तुमचं “नवभारत”ाचं स्वप्न?

या प्रकरणावर आता जनतेनेच उत्तर मागायचं आहे. सत्ता असो वा संघटना, स्त्रीवरील अन्यायाविरुद्ध गप्प राहणं म्हणजे अन्यायालाच समर्थन देणं!

Reactions

Post a Comment

0 Comments