Hot Posts

6/recent/ticker-posts

डिकसळच्या महावितरण सबटेशन कार्यालयाला ग्रामस्थांनी ठोकले टाळे...

 डिकसळच्या महावितरण सबटेशन कार्यालयाला  ग्रामस्थांनी ठोकले टाळे, उध्दट बोलणाऱ्या त्या कामचुकार वायरमन संतोष मोहीते यांची  बदली करा.

सांगोला  (कटुसत्य वृत्त ) :-  सध्या उन्हाळा असल्याने उष्णतामध्ये वाढ  होऊ लागल्याने सांगोला तालुक्यातील डिकसळ गावामध्ये कुलकर्णी व शिंदे वस्तीवरील टान्सफार्म( डि.पी.) दि. 9 रोजी पहाटे मेन लाईनच्या तारा तुटल्याने  दिवबत्ती गायब  झाल्याने काही शेतकर्यांच्या शेतातील पिकांचे नुकसान झाले.तसेच या गावातील  वायरमेन संतोष मोहीते यांना गावातील ग्रामस्थांनी  मोबाईल वरून  संपर्क केला की,साहेब आमच्या शिंदे ,कुलकर्णी वस्तीवर  लाईट नाही,तार तुटली आहे असे बोलले असता तो कामचुकार वायरमेन या कडे  फिरकला देखील नाही.तरी या गावातील सरपंच -चंद्रकांत करांडे, उपसरपंच- रणजित गंगणे,ग्रा.प.सदस्य मिलिंद कुलकर्णी, मधुकर करताडे यांनी डिकसळ येथील महावितरण सबस्टेशन कार्यालयास टाळे ठोकले.ही बाब घेरडी महावितरण शाखा कार्यालय कनिष्ठ अभियंता अशोक आलदर यांना समजताच डिकसळ येथे भेट देऊन ज्या ठिकाणी लाईटच्या तारा तुटल्याने जोडून त्या वस्तीवरील लाईट चालू झाल्याने नागरीकांचा मोठा धोका टळला.तरी या गावातील सरसपंच ,उपसरपंच,सदस्या गावातील ग्रामस्थांनी या वायरमनची बदली होणेबाबत  ग्रामसभेचा ठराव घेऊन वरिष्ठांकडे लेखी तक्रार ही केली आहे.
                 या गावातील वायरमेन संतोष मोहीते यांच्या बद्दल काही ग्रामस्थांची या पुर्वी अनेक वेळा कामात चुकारपणा करतोय म्हणून तक्रार आली होती.परंतू मी त्यांनी तोंडी व लेखी समज दिली होती ,तरी ही तो कामात कामचूकार करीत असून दारू पिऊन गुंग असतो.
 अशोक आलदर
घेरडी शाखा अभियंता.
             सदर ठिकाणी लाईन चेक केली असता असे निदर्शनास आले  की ,मेन लाईनची वायर तुटलेली आढळली असता सदर ठिकाणी २०० फुट वायर जागो जागी तुटलेली असल्याने वायर उपल्बद करण्यासाठी थोडा कालावधी लागल्याने उशिरा झाला व सायंकाळी लाईट चालू करण्यात आली.


Reactions

Post a Comment

0 Comments