जिल्हा परिषदेत सीईओ जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, August 20, 2025

जिल्हा परिषदेत सीईओ जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण

 जिल्हा परिषदेत सीईओ जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-    स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषदेच्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक कुलदीप जंगम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी तिरंगा राष्ट्रध्वजास सामूहिक मानवंदना देण्यात आली. 
सीईओ जंगम यांनी जिल्हावासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सीईओ जंगम यांनी पुष्पहार अर्पण केला. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी आरती ओवाळून अभिवादन केले. यावेळी हरिभाई देवकरण प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत सादर केले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी स्वच्छ सुजल गाव संकल्प मोहिमेची
शपथ दिली. सीईओ जंगम यांनी सर्वअधिकारी, कर्मचाऱ्यांना भेटून स्दिनाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, अमोल जाधव, म्हाडाचे संचालक अजयसिंह पवार, प्रसाद मिरकले, मीनाक्षी वाकडे, डॉ. संतोष नवले, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, सचिन जगताप, कादर शेख,            नरेंद्र खराडे, सुलोचना सोनवणे, हरिदास हावळे, सुनील कटकधोंड, हरिबा सपताळे, सुलभा वठारे, विठ्ठल ढेपे, श्रीकांत मिरगाळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन विस्तार अधिकारी सुहास गुरव यांनी केले. प्रशासन अधिकारी अविनाश गोडसे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages