Hot Posts

6/recent/ticker-posts

सोगाव येथिल शिबीरात ८७ जणांचे रक्तदान

 सोगाव येथिल शिबीरात ८७ जणांचे रक्तदान




वाशिबे (कटूसत्य वृत्त):- अखंड हरिनाम सप्ताह निमित्त श्री शिवलीलामृत पारायण सोहळा सोगाव पश्चिम येथे मोठ्या उत्साहात भव्य दिव्य सोहळा पार पडला. सप्ताह निमित्त काल्याच्या कीर्तना दिवशी जगतगुरू संत तुकाराम महाराजांचे वंशज ह.भ.प. बाळासाहेब देहूकर महाराज यांच्या  झाली.त्याच्या हस्ते रक्तदान शिबिराचे उद्धघाटन करून वृक्षारोपण करण्यात आला.यामध्ये ८७ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. प्रथमच सप्ताह निमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. गाव परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. माजी सरपंच स्वप्निल सोमनाथ गोडगे यांनी रक्तदात्यास पाण्याचा जार भेट दिला. यानिमित्त देवस्थान समिती व सोमेश्वर तरुण मंडळाचे सहकार्य मिळाले. यावेळी मा.उपसरपंच शत्रुघ्न गोडगे, सुनील सरडे, सुभाष सरडे, मा.उपसरपंच अभिमान गोडगे, चेअरमन शांताराम गोडगे , माजी सरपंच राहुल घनवट , वसुदेव सरडे, बळीराम सावंत, तात्यासाहेब सरडे, माजी सरपंच मारुती पवार, देविदास कुलकर्णी,  गोरख पाखरे, राजेंद्र ननवरे, अनिल भोसले,महादेव सलमपुरे,सतीश भोसले उपस्थित होते‌.
Reactions

Post a Comment

0 Comments