Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्हा ओला दुष्काळी जिल्हा म्हणुन जाहीर करा

 सोलापूर जिल्हा ओला दुष्काळी जिल्हा म्हणुन जाहीर करा




संभाजी ब्रिगेडची शासनाकडे मागणी

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात  अतिवृष्टीमुळे पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे शासनाने तात्काळ शेतकऱ्यांच्या शेतातील नुकसानीचे पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई म्हणून मदत तात्काळ देण्यात यावे अशी मागणी शासनाकडे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे

गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रात व सोलापूर जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी मुळे पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. संपुर्ण जिल्ह्यात पावसाने थैमान घातलेला आहे  सोलापूर मध्ये तर पाऊस हा मागील काही आठवड्यापासून हा सतत चालू असल्याने नदी नाले हे ओसंडून वाहत आहेत व त्या पाण्यामुळे पुरामुळे तसेच सततच्या पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे सततच्या पावसामुळे शेतामध्ये सतत पाणी साचून राहिल्याने हंगामी पिकासह सोयाबीन उडीद मूग अधिक खरीप पिकांचे त्याचबरोबर ऊस फळबागांचे हे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे आधीच राज्यांमध्ये आर्थिक हजारो शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत त्यातच निसर्गाने खूप केल्यामुळे यामध्ये अजून भर पडलेली आहे जगाचा पोशिंदा शेतकरी हा जगला पाहिजे शासनाने अनेक विकास कामासाठी करोडो रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे शेतकऱ्यांना सुद्धा करोडो रुपयांचा आर्थिक निधीची नुकसान भरपाई म्हणून तरतूद करणे आवश्यक आहे त्याचबरोबर काही ठिकाणी पुरामुळे शेतकऱ्यांची जनावर ही दगावली गेलेली आहेत अशा परिस्थितीत सोलापूर जिल्हा हा ओला दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर करून शेतकऱ्यांचे झालेले नुकसान याचे लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी त्याचबरोबर पिक विम्याचे ई पोर्टल हे बंद असल्याने शेतकऱ्यांना फोटो अपलोड करताना ही अडचणी येत आहेत त्यामुळे पीक विम्याचे ई पोर्टल व्यवस्थितपणे लवकरात लवकरचालू व्हावे व शेतकऱ्यांना पीक विम्याची ही पैसे लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी आपण स्वतः यात लक्ष घालून शासन स्तरावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीनल दास, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, जिल्हा कार्याध्यक्ष शेखर भोसले, जिल्हा संघटिका सुनीता कोळी, शहर उपाध्यक्ष माधुरी चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष दिलीप निंबाळकर, शहर उपाध्यक्ष फिरोज शेख, शहर कार्याध्यक्ष प्रशांत देशमुख, शहर उपाध्यक्ष संतोष सुरवसे आदी उपस्थित होते.

Reactions

Post a Comment

0 Comments