पिक नुकसानीची आ. कल्याणशेट्टींकडून पाहणी
कासेगाव : (कटूसत्य वृत्त):- मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार व सततच्या पावसामुळे कासेगाव परिसरातील खरीप पिकांसह फळबागा, फळभाज्या व भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याणशेट्टी व तहसीलदार किरण जमदाडे यांनी कासेगाव व परिसरातील विविध गावात प्रत्यक्ष शेतात भेट देऊन शेतशिवारातील नुकसानीची पाहणी केली. आ. कल्याणशेट्टी यांनी कृषी विभागाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर तहसीलदार किरण जमदाडे यांनीही संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश दिले. मे
महिन्यापासूनच पावसाला सुरुवात झाली होती, मात्र सतत झालेल्या पावसामुळे कासेगाव, उळे, वडजी,
वरळेगाव, बक्षीहिप्परगे, गंगेवाडी, उळेवाडी, मुस्ती, मुळेगाव, मुळेगाव तांडा, बोरामणी, तांदुळवाडी या
गावांतील शेतकरी हवालदिल झाले आहेत.
काढणीला आलेली खरीप पिके शेतात कुजून गेली असून फळबागा व भाजीपाला यांनाही मोठा
फटका बसला आहे. शेतकऱ्यांची उपजीविका धोक्यात आली आहे. त्यामुळे शासनाने तातडीने
मदत जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे....
0 Comments