मोहोळ नगरपरिषद प्रभाग रचना; २० सदस्य संख्या
पोखरापूर :(कटूसत्य वृत्त):- मोहोळ नगरपरिषदेच्यानिवडणुकीचे बिगुल पुन्हा एकदा वाजले असून १८ ऑगस्ट रोजी नगरपरिषदेची प्रभाग रचना जाहीर झाली.
लोकसंख्येच्या निकषानुसार मोहोळ नगर परिषदेच्या १०प्रभागांमध्ये २० सदस्य संख्या होणार असून आता इच्छुक उमेदवारांचे आरक्षणाकडे लक्ष लागले आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या बाबतचा निकष लावण्यात आला असून त्यामध्ये मोहोळची लोकसंख्या २७ हजार मोहोळ नगरपरिषद, मोहोळ, मोहोळ नगरपरिषद, मोहोळ. ८३३ आहे. २५ हजार लोकसंख्या असलेल्या शहराला २० सदस्य राहणार आहेत. तर त्या पुढील ३ हजार लोकसंख्येसाठी १ सदस्य वाढणार आहे. केवळ १६७ लोकसंख्या कमी पडल्यामुळे मोहोळ नगरपरिषदेमध्ये २१ सदस्य संख्या होवू शकत नाही.
प्रभागनिहाय लोकसंख्या व परिसर
प्रभाग - १ : लोकसंख्या - २४२६ समाविष्ट परिसर गायकवाड वस्ती, भोसले वस्ती, शिंपळकर वस्ती, जुना बिटले रोड, गायकवाड वस्ती, पंढरपूर रोड, काळे वस्ती, फडतरे वस्ती, मांडवे वस्ती,
प्रभाग - २ : लोकसंख्या - २७०८ समाविष्ट परिसर नवाजनाचा मळा, कुर्डे गल्ली, भांगे वस्ती, गावडे
वस्ती, नागनाथ मंदिर, नागनाथ मांगवडा, बाजार मांगवडा, गायकवाड वस्ती, सोनवणे प्लॉटिंग, स्टेशन रोड
प्रभाग ३ : लोकसंख्या - २७१७ समाविष्ट परिसर - नागनाथ तालीम, नागनाथ मंदिर परिसर, नागनाथ गल्ली, उर्दू शाळा, धनगर गल्ली, रोहिदास नगर, चाटे गल्ली, गुमते घाट, ज्योतिबा मंदिर, साळी- माळी गल्ली
प्रभाग - ४ : लोकसंख्या - ३०२६ समाविष्ट परिसर - स्वामी विवेकानंद शाळा परिसर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, मस्जिद, उजनी कॉलनी परिसर, सिमोलंघन पांद रस्ता परिसर
प्रभाग ५: लोकसंख्या - ३१३४ समाविष्ट परिसर भुसार पेठ, वाणी गल्ली, सराफ पेठ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर, सिमोलंघन पांद रोड, सॉ मिल सोलापूर रोड, बुद्धनगर, कन्या प्रशाला शाळा, सिद्धार्थनगर, मच्छी मार्केट परिसर
प्रभाग - ६ : लोकसंख्या - २५१५ समाविष्ट परिसर ब्राह्मण गल्ली, देशमुख गल्ली, आदर्श चौक, कुंभार गल्ली, बागवान चौक, वडार गल्ली, मेहबूबनगर, आदर्श चौक परिसर, महात्मा फुले भाजी मंडई परिसर, चौमुखी मारुती मंदिर परिसर
प्रभाग - ७ : लोकसंख्या - २६११ समाविष्ट परिसर- कुरेशी गल्ली, बुधवार पेठ, मार्केट यार्ड, मेन रोड, शिवाजी चौक परिसर, संभाजी चौक परिसर, देशपांडे गल्ली
प्रभाग ८ : लोकसंख्या - २६५५ समाविष्ट परिसर कळसे नगर, दत्तनगर, इंदिरानगर, गुलशन नगर, सोमराय नगर, यशवंत नगर, यमाई नगर, संभाजीनगर
प्रभाग ९ : लोकसंख्या - ३०८३ समाविष्ट परिसर क्रांतीनगर, समर्थ नगर, नाईकवाडी नगर, पटेल
नगर, फाटे नगर, गुलमोहर पार्क, साकेत नगर रचना नगर, वायचळ वस्ती, डोके वस्ती, फडतरे वस्ती
प्रभाग १० लोकसंख्या - २९५८ समाविष्ट परिसर- सुभाष नगर, नागनाथ बरे नगर, विद्यानगर, अहिल्यानगर, बागवान नगर, कुंभारखाणी, बालाजी नगर, घरकुल माने वस्ती, गाढवे वस्ती, माने वस्ती,
खरात वस्ती, मायक्का मंदिर, कोकणे वस्ती, चंद्रमोळी एमआयडीसी
0 Comments