Hot Posts

6/recent/ticker-posts

पंढरपूर कॉरिडॉरसाठी ऑक्टोबरपासून भूसंपादन

 पंढरपूर कॉरिडॉरसाठी ऑक्टोबरपासून भूसंपादन




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरातील बहुप्रतिक्षित 'कॉरिडॉर' प्रकल्पासाठी आवश्यक असलेली शासकीय अधिसूचना (गॅझेट नोटिफिकेशन) प्रसिद्ध झाली असून, या सुमारे 2000 कोटी रुपयांच्या भव्य प्रकल्पासाठीची भूसंपादन प्रक्रिया येत्या ऑक्टोबर महिन्यापासून सुरू होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.

या प्रकल्पामुळे केवळ पंढरीचा चेहरामोहरा बदलणार नसून, बाधितांना समाधानकारक मोबदला देत विकासाचा एक नवा आदर्श निर्माण केला जाणार आहे.

प्रकल्पाच्या भूसंपादनासंदर्भात प्रशासनाने अत्यंत सकारात्मक आणि सामंजस्याची भूमिका घेतली आहे. संभाव्य बाधितांसोबत बैठका घेऊन त्यांची मते आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या आहेत. पहिल्या टप्प्यात, ज्या नागरिकांनी संमती दिली आहे, त्यांची जागा संपादित केली जाईल. त्यामुळे सक्तीने भूसंपादन करण्याचा प्रशासनाचा कोणताही विचार नाही, असे जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. मात्र, काही ठिकाणी विरोध झाल्यास, कायद्यातील तरतुदीनुसार तीन महिन्यांनंतर सक्तीने भूसंपादन करण्याचा पर्याय खुला ठेवण्यात आला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments