Hot Posts

6/recent/ticker-posts

सांगोला शहरातील बायपास रस्ताच्या काँक्रिटीकरणासाठी 4कोटींचा निधी तातडीने मिळावा.

 सांगोला शहरातील बायपास रस्ताच्या काँक्रिटीकरणासाठी 4कोटींचा निधी तातडीने मिळावा.

आ. शहाजीबापू पाटील यांनी केली नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी.



 सांगोला (कटुसत्य वृत्त ) :- सांगोला शहरातील अत्यंत वर्दळीचा असणारा परंतु खूपच खराब झालेला मिरज रेल्वेगेट ते वंदे मातरम चौक हा बायपास रस्ता तातडीने काँक्रिटीकरण करणेसाठी नगरविकास विभागातील नगरपालिकेसाठीच्या विशेष रस्ता अनुदानातुन 4कोटींचा विशेष निधी तातडीने मंजूर करावा अशी मागणी आ.शहाजीबापू पाटील यांनी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे
               यावर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला नगरपालीकेच्या बायपास रस्ताच्या काँक्रिटीकरणासाठी 4कोटींचा व वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मागणी केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील शॉपिंग सेंटर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृहाचे नूतनीकरण, नगरपालिका कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या फर्निचर साठी व महात्मा ज्योतिबा फुले भाजी मंडई या ठिकाणी बहुपयोगी सभागृह या चार कामासाठी 7 कोटी असे एकूण 11 कोटींचा निधी त्वरित मंजूर केला जाईल असे सांगितले.
          मुंबई येथे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनावेळी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी आ. शहाजीबापू पाटील यांनी सांगोला नगरपालिकेच्या विविध कामांसाठी निधी देण्याची मागणी केली 
             सांगोला शहरातील बायपास रस्त्याचे सध्या खूपच दुरवस्था झाली असून नगरपालिकेकडे दुरुस्तीसाठी निधीची कमतरता असल्याने व शहरातील नागरिकांची बायपास रस्ता दुरुस्तीची आग्रही मागणी असल्याने आ.  शहाजीबापू पाटील यांनी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खास बाब म्हणून सदरचा निधी मंजूर करावा अशी मागणी केली आहे लवकरच या सर्व कामांना मंजुरी मिळून 11 कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे व लगेच या विकास कामांना सुरुवात करण्यात येईल असे आ. शहाजीबापू पाटील यांनी सांगितले.

Reactions

Post a Comment

0 Comments