Hot Posts

6/recent/ticker-posts

जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 चा निधी मार्च अखेर खर्च करण्यासाठी यंत्रणानी काटेकोरपणे नियोजन करावे - पालकमंत्री गोरे

 जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 चा निधी मार्च अखेर खर्च 

करण्यासाठी यंत्रणानी काटेकोरपणे नियोजन करावे  - पालकमंत्री गोरे 


सोलापूर(कटूसत्य वृत्त):- जिल्हा वार्षिक योजना सन 2024 25 अंतर्गत सर्वसाधारण योजना 83 टक्केअनुसूचित जाती उपयोजना 51 टक्के व आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 27% असा एकूण 78 टक्के निधी 20 जानेवारी पर्यंत खर्च झालेला आहे. तरी उर्वरित मंजूर निधी माहे मार्च 2025 अखेर पर्यंत खर्च करण्याची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखाची असून त्यासाठी काटेकोरपणे नियोजन करावेअसे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वादमनपा आयुक्त शितल उगले तेलीपोलीस आयुक्त एम. राजकुमारमुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगमपोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णीखासदार धैर्यशील मोहिते पाटील( ऑनलाईन द्वारे) खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकरआमदार सर्वश्री सुभाष देशमुखदेवेंद्र कोठेसमाधान आवतडेसचिन कल्याणशेट्टीदिलीप सोपलराजू खरेअभिजीत पाटीलउत्तम जानकरडॉ. बाबासाहेब देशमुखनारायण पाटीलजिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्या सह सर्व समिती सदस्य उपस्थित होते.


     पालकमंत्री जयकुमार गोरे पुढे म्हणाले की सन 2024 -25 चा 100% निधी खर्च करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक गतीने काम करावे. ज्या यंत्रणांनी अद्याप प्रशासकीय मागणीसाठी आवश्यक कार्यवाही केली नाही त्यांनी ती तातडीने पूर्ण करावी. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सर्वांच्या सहकार्यातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करूयातयामध्ये सर्व समिती सदस्यांची भूमिका ही महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.


    तसेच जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण 861.89 कोटीअनुसूचित जाती उपयोजना 152 कोटी तर आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना 5.44 कोटी अशा एकूण 1 हजार 19 कोटी 33 लाखाच्या प्रारूप आराखड्यास राज्य समिती समोर सादर करण्यासाठी समितीने मान्यता दिल्याचे पालकमंत्री गोरे यांनी सांगितले. शासनाने ठरवुन दिलेल्या आर्थिक मर्यादेत जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण करीता 661.89 कोटीचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला आहे.


तसेच शिक्षणआरोग्यरस्ते विकासनगरविकासजनसुविधा यासारख्या महत्वाच्या बाबींकरीता  200 कोटींची अतिरिक्त मागणीचा पुरक आराखडा सादर केल्याची माहिती त्यांनी दिली.


     हे शासन शेतकऱ्याचे असून शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम न मिळणे हे खूप गंभीर बाब आहे या बाबीची चौकशी करून सविस्तर अहवाल प्रशासनाने सादर करावा. शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही पालकमंत्री गोरे यांनी यावेळी सांगितले. तसेच बँकांनी शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी दिरंगाई न करता वेळेत कर्जपुरवठा करावा. आरोग्य विभागात नियोजन समितीच्या मान्यतेशिवाय कामे झाली असतील तर त्याची चौकशी करून अहवाल सादर करावा असेही त्यांनी सुचित केले. त्याप्रमाणेच आजच्या बैठकीत समितीच्या वतीने आठ क वर्ग तीर्थक्षेत्रांच्या प्रस्तावांना मान्यता देण्यात आली. महसूल प्रशासन पोलीस प्रशासन त्यांनी वाळू तस्करावर कडक कारवाई करावी असेही निर्देश त्यांनी दिले.


      यावेळी उपस्थित लोकप्रतिनिधी यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने नियोजन समितीतून निधी मिळणेजुनी कामे वेळेत मार्गे लावणेशेतकऱ्यांना पीक विमा मिळणेपीक कर्जाचा पुरवठा बँकांनी करणेपाणीपुरवठा योजनेच्या बिलापोटी निधी मिळणेपंधरावा वित्त आयोगाच्या निधी वाटपकृषी यांत्रिकीकरणठिबक अनुदाननियमित कर्ज पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पर अनुदान  मिळणेरोहित्र दुरुस्तीसाठी निधी मिळणेतीर्थक्षेत्रांना मान्यता देणेनवबौद्ध घटकाच्या योजनांसाठी निधी उपलब्ध करणेदुहेरी पाईपलाईनच्या अनुषंगाने त्वरित कारवाई करणेक्रीडा विभाग व आरोग्य विभागात समितीच्या निधीतून प्रस्तावित केलेल्या कामांची चौकशी करणे आदी मागण्या करून या अनुषंगाने त्वरित कार्यवाही करणे बाबत पालकमंत्री महोदयांनी लक्ष घालण्याचे मागणी करण्यात आली.

     प्रारंभी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्हा वार्षिक योजना सन 2024 -25 व सन 2025 26 बाबत बैठकीत माहिती दिली. तर जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांनी समिती समोरील विषयाचे वाचन केले.

 

सन 2024-25 दि. 20. जानेवारी 2025 अखेरच्या खर्चाचा योजनानिहाय तपशिल :-

 

    जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण ) करीता  - अर्थ संकल्पीय तरतूद- 702 कोटीप्रशासकीय मान्यता रक्कम- 620.90 कोटीप्राप्त एकूण निधी – 280.80 कोटीएकूण वितरीत निधी – 259.15 कोटीएकूण खर्च – 233.45 कोटीखर्च टक्केवारी प्राप्त तरतुदींशी – 83 टक्के.

 

अनुसूचित जाती उपयोजना करीता - अर्थ संकल्पीय तरतूद- 152 कोटीप्रशासकीय मान्यता रक्कम- 119.26 कोटीप्राप्त एकूण निधी – 52.16 कोटीएकूण वितरीत निधी –48.28 कोटीएकूण खर्च – 26.50 कोटीखर्च टक्केवारी प्राप्त तरतुदींशी – 51 टक्के.

 

आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना करीता -  अर्थ संकल्पीय तरतूद- 4.28 कोटीप्रशासकीय मान्यता रक्कम- 1.89 कोटीप्राप्त एकूण निधी –1.71 कोटीएकूण वितरीत निधी –0.97 कोटीएकूण खर्च – 0.46 कोटीखर्च टक्केवारी प्राप्त तरतुदींशी – 27 टक्के

 

     जिल्हा वार्षिक योजना- सन 2025-26:-

जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण ) करीता  -  राज्य शासनाने   घातलेली आर्थिक मर्यादा – 661.89 कोटीयंत्रणांची मागणी – 1610.90 कोटीमर्यादेत तयार करण्यात आलेला प्रारुप आराखडा किंमत – 661.89 कोटी,  प्रस्तावित अतिरिक्त मागणी – 200 कोटी,  एकूण आराखडा – 861.89 कोटी.

 

अनुसूचित जाती उपयोजना करीता - राज्य शासनाने   घातलेली आर्थिक मर्यादा – 152 कोटीयंत्रणांची मागणी – 172.80 कोटीमर्यादेत तयार करण्यात आलेला प्रारुप आराखडा किंमत – 152 कोटी,  प्रस्तावित अतिरिक्त मागणी – 0.00 कोटी,  एकूण आराखडा – 152 कोटी.

 

आदिवासी क्षेत्राबाहेरील उपयोजना करीता -  राज्य शासनाने   घातलेली आर्थिक मर्यादा – 5.44 कोटीयंत्रणांची मागणी – 5.44 कोटीमर्यादेत तयार करण्यात आलेला प्रारुप आराखडा किंमत – 5.44 कोटी,  प्रस्तावित अतिरिक्त मागणी – 0.00 कोटी,  एकूण आराखडा – 5.44 कोटी.

 

जिल्हा वार्षिक योजना ( सर्वसाधारण ) सन 2025-26 प्रारुप आराखड्याची ठळक वैशिष्टे:-

 

*कृषी व संलग्न सेवा (पशुसंवर्धन,मत्स्यव्यवसाय,वने,सहकार)  - रुपये 50.26 कोटी

•ग्रामीण क्षेत्राच्या विकासाच्या योजना   - रुपये 60 कोटी                         

•जलसंधारण विभागाच्या योजना – रुपये 55 कोटी                                  

•ऊर्जा विकास ( MSEB  व अपारंपारीक ऊर्जा)  -  रुपये 60 कोटी

•शिक्षण विभागाच्या योजना – रुपये 39 कोटी

•महिला ब बाल विकासाच्या योजना   - रुपये 19.85 कोटी

•आरोग्य सेवांचे बळकटीकरण  - रुपये 63.15 कोटी

•नगर विकासाच्या योजना   - रुपये 106 कोटी

•रस्ते व परिवहन     - रुपये 68.20 कोटी

•पर्यटनतिर्थक्षेत्र,गड किल्लेसंरक्षित स्मारके यांचे संवर्धन व विकास – रुपये . 46.20 कोटी

•पोलिस व तुरुंग व्यवस्थेचे बळकटीकरण   रुपये – 21.85 कोटी

 

जिल्ह्यातील आठ तीर्थक्षेत्रांना समितीची मान्यता...

·         श्री. क्षेत्र जकराया देवस्थानमौजे-तेलगाव (सिना)ता. उ. सोलापूर

·         श्री. क्षेत्र कानिफनाथ देवस्थानमौजे-गाताची वाडीता. बार्शी

·         श्री. क्षेत्र म्हस्कोबा देवस्थानमौजे- लक्ष्मी दहीवडीता. मंगळवेढा

·         श्री. क्षेत्र महालिंगराया देवस्थानमौजे-मरवडेता. मंगळवेढा

·         श्री. क्षेत्र गुरुगंगालिंग महाराज मंदिर देवस्थानमौजे हिळळी ता. अक्कलकोट

·         श्री. क्षेत्र विठ्ठल रुक्मिणी व मारुती मंदिर देवस्थानमौजे जाधववाडीता. पंढरपूर

·         श्री. क्षेत्र शिव शिवाई देवस्थानमौजे कोरफळेता. बार्शी

·         श्री. क्षेत्र बिरोबा देवस्थानमौजे तपकिरी शेटफळता. पंढरपूर


Reactions

Post a Comment

0 Comments