पुणे पदवीधर निवडणूक २०२६ : संभाजी ब्रिगेडची कृतिशील सुरुवात
सोलापूर (कटूसत्य वृत्त): -संभाजी ब्रिगेडचा २०२५ वर्धापनदिन बिदर येथे अत्यंत उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडलेल्या या सोहळ्यानंतर पुणे पदवीधर निवडणूक २०२६ अनुषंगाने रणनीती, नियोजन व भावी दिशा याबाबत सखोल चिंतनसत्र घेण्यात आले.
निश्चित रणनितीनुसार निवडणुकीच्या पहिल्या सत्रातील प्रचार–प्रसार–नोंदणी याची कृतिशील सुरुवात संभाजी ब्रिगेडचे महासचिव शिवश्री सौरभ दादा खेडेकर आणि उपाध्यक्ष शिवश्री अभिमन्यूजी पवार यांच्या नेतृत्वाखाली, युवा उमेदवार इंजि. मनोजकुमार गायकवाड यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत करण्यात आली.
मान्यवरांच्या भेटीत उमेदवार परिचय व विकासधोरणांवरील चर्चा
पुणे पदवीधर निवडणूक २०२६ च्या तयारीचा भाग म्हणून विविध मान्यवरांच्या भेटी घेऊन पदवीधरांच्या अपेक्षा, प्रश्न आणि विकासधोरणांवर सविस्तर चर्चा झाली.
भेटीची प्रमुख स्थळे —
१) इंदापूर कोर्ट – बार असोसिएशन वकिल परिवार
२) नारायणदास रामदास हायस्कूल, इंदापूर – शिक्षक वृंद
या दोन्ही ठिकाणी इंजि. मनोजकुमार गायकवाड यांनी स्वतः उपस्थित राहून उमेदवार परिचय दिला, विकासविषयक त्यांच्या भूमिका व भविष्यातील ध्येयधोरणे मांडली.
“आजवर उमेदवार कधी भेटलाच नाही!” उत्साहात स्वागत
वकिल परिवार व शिक्षक वृंद यांनी उमेदवार वैयक्तिकरित्या भेटण्यासाठी आले याबद्दल विशेष समाधान व्यक्त केले.
नागरिकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले, “आजवर अनेक वेळा मतदान केले, पण उमेदवार कधी भेटलेच नाहीत. निवडून आल्यावरही पदवीधरांसाठी ठोस कार्य दिसत नाही.”
इंजि. गायकवाड यांच्या प्रत्यक्ष संवादामुळे कार्यकर्ते, पदवीधर व स्थानिक मान्यवरांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले.
पदवीधर नोंदणी प्रक्रियेसाठी अभिनंदन
इंजि. मनोजकुमार गायकवाड यांच्या प्रयत्नातून पदवीधर नोंदणी प्रक्रिया ऑनलाइन झाली तसेच नोंदणीची मुदत वाढविण्यात आली. याबाबत वकिल व शिक्षक वृंद यांनी त्यांचे अभिनंदन केले व यातून सामान्य पदवीधरांना मोठा फायदा झाल्याचे समाधान व्यक्त केले.
संपर्कात राहा, सुचना मांडा — संभाजी ब्रिगेडचे आवाहन
पदवीधर विकास, स्थानिक समस्या व धोरणात्मक सुचना सातत्याने संघटनेपर्यंत पोहोचाव्यात यासाठी संबधित पेज लाईक करून आपले अभिप्राय, सूचना व फोटो पाठवावेत, असे आवाहन संभाजी ब्रिगेडतर्फे करण्यात आले आहे.
संभाजी ब्रिगेडच्या या कृतिशील उपक्रमामुळे पुणे पदवीधर निवडणूक २०२६ च्या प्रचाराला एक टप्पा गती मिळाला असून पदवीधरांशी थेट संवाद साधणारा हा उपक्रम विशेष दखलपात्र ठरत आहे.


0 Comments