अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान; पंचनामे जलद करण्याच्या सूचना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान; पंचनामे जलद करण्याच्या सूचना

 अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान; पंचनामे जलद करण्याच्या सूचना



 

बार्शी (कटूसत्य वृत्त):- गेल्या दोन दिवसांतील वादळी वारे व अवकाळी पावसामुळे ज्वारी, हरभरा, गहू तसेच द्राक्ष, आंबा आणि चिंच उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी बार्शी येथे संबंधित महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने जलद गतीने कार्यवाही करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. कोणत्याही शेतकऱ्याने काळजी करू नये; नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासन दरबारी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
कांद्याचे दर कोसळले; ५ रुपये प्रति किलो अनुदानाची मागणी
दरम्यान, काही दिवसांत कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. ३,००० रुपये प्रति क्विंटल असलेला कांद्याचा दर सध्या ४०० ते ८०० रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी प्रति किलो ५ रुपये अनुदान देण्याची मागणी देवेंद्र फडणवीस व पणन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे करण्यात आली आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांची लवकरच भेट घेण्याचे नियोजन असल्याची माहिती राजेंद्र राऊत यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages