रमजानमध्ये व्यवसायाला रात्री १ वाजेपर्यंत परवानगी द्यावी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

रमजानमध्ये व्यवसायाला रात्री १ वाजेपर्यंत परवानगी द्यावी

 रमजानमध्ये व्यवसायाला रात्री १ वाजेपर्यंत परवानगी द्यावी




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सध्या पवित्र रमजान महिना सुरू असून या काळात मुस्लिम बांधव दिवसभर उपवास पाळतात. सायंकाळी इफ्तारच्या वेळी तसेच रात्री उशिरापर्यंत बाजारपेठांमध्ये नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ वाढत असल्याने सोलापूर शहरातील दुकाने, स्टॉल्स, हॉटेल्स व इतर व्यावसायिक आस्थापनांना रमजान महिन्यात रात्री १ वाजेपर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी एमआयएमच्या नगरसेवकांनी पोलीस आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, इफ्तारच्या वेळी नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येत असल्यामुळे वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी तसेच शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासनाने आवश्यक ती सवलत व सहकार्य द्यावे.
तसेच इफ्तार आणि सायंकाळच्या नमाजवेळी नागरिकांना सूचना देण्यासाठी मशिदींमधून किंवा निश्चित ठिकाणी केवळ दहा मिनिटांसाठी लाऊडस्पीकर वापरण्याची परवानगी देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
रमजान महिन्यातील धार्मिक भावना, वाढती गर्दी आणि व्यापाऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेऊन प्रशासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नगरसेवकांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages