आता 'फिडेल'च्या सेवा विस्तार साठी मोठ्या प्रमाणात नवीन संधी - सुनील कुलकर्णी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

आता 'फिडेल'च्या सेवा विस्तार साठी मोठ्या प्रमाणात नवीन संधी - सुनील कुलकर्णी

 आता 'फिडेल'च्या सेवा विस्तार साठी मोठ्या प्रमाणात नवीन संधी - सुनील कुलकर्णी 





पुणे (कटूसत्य वृत्त):- 'फिडेल सॉफ्टटेक लि.' या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील नामांकित कंपनीने जपान मधील 'आयएम कॉर्पोरेशन' या तंत्रज्ञान सल्लागार व सॉफ्टवेअर सेवा देणाऱ्या कंपनीत ८३ टक्के हिस्सा संपादित केला आहे. यामुळे पुढील काळात 'फिडेल' च्या सेवा, वितरण क्षमतेला मोठी चालना मिळणार असून कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सेवा विस्तार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नवीन संधी उपलब्ध होणार आहेत अशी माहिती 'फिडेल'चे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील कुलकर्णी यांनी पुणे येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आयएम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी रेन्या किकुची, फिडेलचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्राची कुलकर्णी, मंदार इनामदार, मुख्य तंत्रज्ञान अधिकारी सुश्रुत पोतदार, आयएमचे विक्री विभाग प्रमुख नागता योशीयाशु, सिस्टीम विभाग प्रमुख ताकाशी सातो, पीसीईटीचे कार्यकारी अधिकारी डॉ. गिरीश देसाई, फिडेलचे व्यवस्थापन सल्लागार अनिल पटवर्धन, डॉ. दीपक शिकारपूर, आयएमएचे ग्लोबल बोर्ड माजी अध्यक्ष सुनील देशमुख आदी उपस्थित होते.
     सुनील कुलकर्णी यांनी सांगितले की, फिडेल सॉफ्टटेक ही तीन दशकांहून अधिक अनुभव असलेल्या जपान येथील मराठी उद्योजकाची कंपनी आहे. जपान आणि भारत यामध्ये उच्च दर्जाचे तंत्रज्ञान, बायलिंग्वल कन्सल्टिंग आणि भाषा अभियांत्रिकी क्षेत्रात २५ वर्षांपासून कार्यरत आहेत. या भागीदारीमुळे जपानी उद्योगांच्या गरजांनुसार तयार केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित सेवा, उद्योग उपाययोजना अंमलबजावणी, द्विभाषिक सल्ला, व्यवस्थापित सेवा आणि भाषा स्थानिकीकरण या क्षेत्रांमध्ये 'फिडेल'च्या क्षमतेमध्ये मोठी वाढ होईल. स्थानिक प्रकल्प व्यवस्थापन कौशल्य आणि जागतिक तंत्रज्ञान क्षमते द्वारे नावीन्यपूर्ण परिणाम देण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे, असे कुलकर्णी यांनी सांगितले.
  आयएम कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि सीइओ रेन्या किकुची यांनी सांगितले की, सुनील कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली आता फिडेल सॉफ्टटेक आणि आयएम कॉर्पोरेशनच्या सेवा आणखी उच्च दर्जाने देता येईल. गेल्या तीन वर्षात आयएम ने डिलिव्हरी उत्पादकता आणि ज्ञान पुनर्वापर सुधारण्यासाठी त्यांच्या मालकीच्या न्युरल नॉलेज फ्रेमवर्कचा वापर करून मॉडेल्स विकसित केले आहेत. १५० पेक्षा अधिक कुशल व्यवसायिकांच्या टीमसह उच्च गुणवत्ता आणि तंत्रज्ञान सेवा देण्यासाठी आम्ही एकत्रितपणे सज्ज झालो आहोत.
    पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले की, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत असणारा एक मराठी उद्योजक जपान मध्ये जाऊन आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण करतो आणि अल्पावधीतच आयएम सारख्या कंपनीचा मोठा हिस्सा संपादित करतो ही बाब सर्व भारतीय उद्योजकांना तसेच स्टार्टअप सुरू करणारे उद्योजकांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे. आयएम कॉर्पोरेशन आणि त्यांच्या परंपरागत ग्राहकांनी फिडेल सॉफ्टटेक वर दाखवलेला विश्वास सुनील कुलकर्णी आणि त्यांचे टीम सार्थ ठरवेल.
  अनिल पटवर्धन म्हणाले की, फिडेल सॉफ्टटेक जून २०२२ मध्ये सूचीबद्ध झाली आहे. तेव्हापासून सातत्याने महसूल वाढ नोंदवली आहे. 
  डॉ. दीपक शिकारपूर यांनी सांगितले की, या कंपनीचा विकास मार्ग तिच्या भागधारकांसाठी मजबूत मूल्य निर्माण करेल आणि गुंतवणूकदारांना उत्साहवर्धक करता येईल असा विश्वास आहे. 
   सुनील देशमुख म्हणाले की, आयएम आणि फिडेल एकत्रितपणे नवीन कौशल्यासह ग्राहकांना उत्तम सेवा देऊन आणि भागधारकांना वाढीच्या संधी उपलब्ध करून देतील.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages