शाळा सकाळ सत्रात भरवा; प्राथमिक शाळा संयुक्त कृती समितिची मागणी - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, February 27, 2026

शाळा सकाळ सत्रात भरवा; प्राथमिक शाळा संयुक्त कृती समितिची मागणी

 शाळा सकाळ सत्रात भरवा; प्राथमिक शाळा संयुक्त कृती समितिची मागणी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शहर व जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळा मार्चपासुन सकाळ सत्रात भरवा.अशा मागणीचे निवेदन खाजगी प्राथमिक शाळा संयुक्त कृती समितीच्यावतीने  प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांना दिल्याची माहीती डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश महासचिव सुनिल चव्हाण यांनी दिली.
    डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद,युवक शिक्षक कर्मचारी संघटना,महाराष्टृ राज्य शिक्षक सेना व अखिल भारतीय उर्दु शिक्षक संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्यावतीने हे निवेदन देण्यात आले.या निवेदनावर आप्पाराव इटेकर,विनोद आगलावे,वल्लभ चौगुले व अ.गफुर अरब यांच्या सह्या आहेत.सध्या उन्हाळा चालु असुन तापमान ३८ अंश सेल्सियसच्या आसपास आहे.उन्हाची तीव्रता वाढत आहे.सोलापुर शहराला पाच दिवसाआड एकदा पाणीपुरवठा होतो.त्यामुळे अनेक शाळांमध्ये  पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण होते.हद्दवाढ भागामध्ये व ग्रामीण भागात ही समस्या प्रकर्षाने जाणवते.त्यातच रमजानचा महिना सुरु असल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे उपवास (रोजे) असतात.वाढत्या तापमानाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.पिण्याच्या पाण्याची समस्या व वाढते तापमान याचा विचार करुन शाळा सकाळ सत्रात भरविण्यात याव्यात.असे निवेदनात म्हंटले आहे.शालेय समितीच्या सभेमध्ये या विषयावर चर्चा करुन योग्य निर्णय घेतला जाईल.असे आश्वासन प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी शिष्टमंडळाला दिले.या शिष्टमंडळात बरगली लांडगे, राजेंद कुंभार,मल्लिकार्जुन बगले,सागर स्वामी,नवनाथ भोसले आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages