Hot Posts

6/recent/ticker-posts

नंदेश्वर ते हुन्नूर रस्त्याची अवस्था अत्यंत खराब

 नंदेश्वर ते हुन्नूर रस्त्याची अवस्था अत्यंत खराब



भोसे (कटूसत्य वृत्त):- मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर ते हुन्नूर रस्त्याचे अवस्था अत्यंत खराब झाली असून या रस्त्यावर जागोजाग खड्डे पडले असून या रस्त्यावरून प्रवास करताना प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून सार्वजनिक बांधकाम विभाग झोपेची सोंग घेऊन बसलेला असून त्यांना जागे करण्याची वेळ आलेली असून, सार्वजनिक बांधकाम विभाग कधी जागा होतो व आमचा रस्ता कधी दुरुस्त करून मिळेल अशी मागणी या रस्त्यावरून प्रवास करणारे जनतेतून होत आहे. 

याबाबत सविस्तर वृत्त असे की, किल्ल्याच्या ते हुन्नूर हा रस्ता अत्यंत खराब झालेला होता. मागील काही महिन्यापूर्वी पाटखळ ते नंदेश्वर हा रस्ता डांबरीकरण करून प्रवाशांना वाहतुकीसाठी खुला केला पण, नंदेश्वर ते हुन्नूर हा रस्ता ठेकेदारांनी अर्धवट सोडलेला असून या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे आणि ह्या रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले असून कोणता खड्डा चुकवावा हा प्रश्न प्रवास वर्गात पडलेला आहे. आपण खड्ड्यातून प्रवास करतो की रस्त्यावरून प्रवास करतो हाच प्रश्न येथील प्रवासी वर्गाला पडलेला आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना आत्तापर्यंत अपघात घडलेली असून सार्वजनिक बांधकाम विभाग डोळे झाकून गांधारीची भूमिका घेत आहे. संबंधित ठेकेदार ने हा रस्ता अर्धवट सोडलेला असून त्याच्यावर ही कारवाई करावी. व सदर जरासा तात्काळ पूर्ण करावा अशी मागणी येथील प्रवासी जनतेतून होत आहे.

या रस्त्याबाबत सर्व प्रवाशांनी की करून स्थानिक लोकप्रतिनिधींना व प्रशासनाला जाब विचारण्याची वेळ आली आहे अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments