तौफिक पैलवान, बाबा मिस्त्री, परवीन इनामदार, अबूबकर सय्यद, नुरुद्दीन मुल्ला आले एकत्र

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल लवकरच वाजणार असल्याचे बोलले जाते आहे" अशातच सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग रचना ही जाहीर करण्यात आली" त्यासोबतच आरक्षण सोडत देखील संपन्न झाले. सोलापूर शहरातील काही प्रभागांमध्ये मोठे बदल या वेळेस पाहाव्यास मिळाले विशेषता प्रभाग क्रमांक 21 व 20 या प्रभागात मोठे बदल करून प्रभाग क्रमांक 21 चा भाग हे प्रभाग क्रमांक 20 मध्ये आल्याने सर्वेच अचंबित झाले" कारण प्रभाग क्रमांक 20 येथून नेहमी बाबा मिस्त्रीचे पॅनल निवडून येतो व प्रभाग क्रमांक 21 येथून तोफिक पैलवान यांचा पॅनल निवडून येतं अशातच दोन्ही प्रभाग एकमेकात आल्याने नेमकी तोफिक पैलवान बाबा मिस्त्री हे कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचेच लक्ष असताना काल नई जिंदगी परिसरातील प्रभाग क्रमांक 20 मधील भीमाशंकर नगर येथे तौफिक पैलवान, बाबा मिस्त्री, परवीन इनामदार, अबूबकर सय्यद, नुरोदिन मुल्ला यांना एकत्र आणण्याचं काम AR शैक्षणिक सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक रईस शेख व मतीन NK यांच्यावतीने करण्यात आले. निमित्त होते हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती चे 19 नोव्हेंबर हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीचे औचित्य साधून व तसेच N.K सोशल ग्रुपचे संस्थापक प्रसिद्ध ग्राफिक डिझायनर मतीन एन के यांचे वाढदिवसानिमित्त AR शैक्षणिक सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने भीमाशंकर नगर येथे हिजामा कॅम्प व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान यावेळी आलेले प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पर सत्कार AR शैक्षणिक सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने करण्यात आले. दरम्यान भीमाशंकर नगर परिसरातील नागरिकांनी हीजामा कॅम्प व नेत्र तपासणी शिबिरात सहभागी होत तपासणी करून घेतले तसेच आलेले प्रमुख मान्यवरांच्या हस्ते AR शैक्षणिक सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेच्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले.
0 Comments