गुंडांना_जामीन_नेत्यांना_जमीन
पुण्यातील कोयता गँगच्या दहशतीवरून सरकारवर टीकांचा भडिमार
पुणे (कटूसत्य वृत्त):- पुण्यात रात्री उघड्यावर हातात कोयता घेऊन हॉटेल चालकाला धमकावून लुटल्याच्या ताज्या प्रकाराने शहरातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. सोशल मीडियावरही या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
विरोधक आणि नागरिकांनी मुख्यमंत्री यांच्यावर थेट निशाणा साधत विचारले आहे की, “रात्रंदिवस पुण्यात कोयता गँग दहशत माजवत असताना सरकार काय करत आहे? चार-पाच गुंडांना पकडून बॅनरबाजी करण्यापलीकडे नेमकी कारवाई कुठे दिसते?”
अलीकडेच घडलेली कोयता धाक दाखवून लुटण्याची घटना ही काही एकटी नाही, तर सलग घडत असलेल्या गुन्ह्यांच्या मालिकेचा भाग असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. “कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजले” नागरिकांचे आरोप पुण्यातील अनेक भागांत रात्री कोयता गँगची दहशत असल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात.
नागरिकांचा थेट प्रश्न “पुणेकरांनी अजून किती दिवस भीतीत राहायचं?"
टीकाकारांनी मुख्यमंत्री यांच्यावर कठोर शब्दात टीका करत विचारलं आहे की, पुण्यात गुन्हेगार सड्यावर फिरत असताना सरकार कोणती पावले उचलणार?भयमुक्त पुण्यासाठी तातडीच्या उपाययोजना होणार की फक्त निवडक प्रसंगी फोटोसेशन?पोलीस प्रशासनाला योग्य ती कडक निर्देश दिले जातील की परिस्थिती तशीच सोडली जाईल?
सरकारकडून याबाबत अद्याप ठोस प्रतिक्रिया न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली आहे.
विरोधक आणि सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे की, “सरकारने कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याबाबत गंभीरता दाखवली नाही तर गुंडांचे मनोबल वाढेल आणि पुण्याची ओळखच धोक्यात येईल.”
पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे निर्माण झालेल्या भयग्रस्त वातावरणावर त्वरित नियंत्रण आणावे, अशी सर्वसामान्य पुणेकरांची मागणी असून, आता सरकार कोणती ठोस पावले उचलते, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

0 Comments