Hot Posts

6/recent/ticker-posts

दोन दिवसात दहा उमेदवारी अर्ज दाखल

 दोन दिवसात दहा उमेदवारी अर्ज दाखल




१३ नोव्हें रोजी चैतन्य देशमुख यांचा पहिला उमेदवारी अर्ज तर काल दिनांक १४ रोजी नऊ अर्ज दाखल


मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दहा नोव्हेंबर पासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यास प्रारंभ झाला आहे. नगरसेवक पदासाठी १३ नोव्हेंबर रोजी चैतन्य पद्माकर देशमुख यांनी प्रभाग दहा मधून सर्वसाधारण प्रवर्गातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल करत या निवडणूक प्रक्रियेच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेचा जणु शुभारंभ केला आहे. तर काल म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी तब्बल नऊ इच्छुक उमेदवारांनी आपापले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार निलेश पाटील यांच्याकडे सुपूर्द केले.
त्यामध्ये प्रभाग क्रमांक दोन मधून रणजीत रामकिसन देशमुख आणि अजय अनिल कुर्डे या दोघांनी सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
नूरजहान नसरुद्दीन मोमीन यांनी प्रभाग क्रमांक तीन मधून, तर भारती भारत बरे यांनी प्रभाग क्रमांक सात मधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अझरुद्दीन अनिस कुरेशी यांनी प्रभाग क्रमांक सात मधून, प्रभाग क्रमांक आठ मधून प्रमोद मोहन डोके यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 
प्रभाग क्रमांक दहा मधून सीना दिनकर गडदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून अभय तानाजी देशमुख आणि जहीर इकबाल खरादी यांनीही सर्वसाधारण प्रवर्गातून प्रभाग दहा मधून उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काल म्हणजे १४ नोव्हेंबर रोजी नऊ उमेदवारांनी तर १३ नोव्हेंबर रोजी एक असे एकूण दहा उमेदवारी अर्ज मोहोळ नगरपरिषद निवडणुकीसाठी दाखल झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार निलेश पाटील यांनी दिली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी निलेश पाटील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शशिकांत भोसले सहाय्यक म्हणून निवडणूक नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे रणजीत कांबळे यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी योग्य नियोजन करत आणि प्रशासकीय स्तरावरून आलेल्या सूचनांचे पालन केले आहे.. मोहोळचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे, पोलीस निरीक्षक किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक गायकवाड, क्षिरसागर यांनी आवश्यकतेनुसार निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments