Hot Posts

6/recent/ticker-posts

प्रभाग क्रमांक सहा मधील राजकीय रणनीती पुन्हा कायम :

 प्रभाग क्रमांक सहा मधील राजकीय रणनीती पुन्हा कायम :






माजी उपनगराध्यक्ष असलेले दिवंगत नेते स्व. शौकतभाई तलफदार यांच्या पत्नी शहनाज तलफदार निवडणूक लढवणार

ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील यांची विचारधारा आणि माजी उपनगराध्यक्ष स्व.शौकतभाई यांची विकासधारा अविरत सुरू ठेवण्यासाठी तलफदार परिवाराचा निर्णय

मोहोळ (कटूसत्य वृत्त):- मोहोळ शहराच्या उत्तर भागातील आणि शहराच्या मध्यवर्ती परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक सहा मधून कोण कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरणार याबाबत बरेच तर्कवितर्क आणि उत्सुकता कायम होती यापूर्वीचा प्रभाग क्रमांक दोन आणि प्रभाग क्रमांक तीन या जुन्या प्रभागांचा समावेश असलेला प्रभाग क्रमांक सहा हा नव्याने निर्मित झालेला प्रभाग आहे.

 यापूर्वी प्रभाग क्रमांक दोनच्या नगरसेवक पदाची धुरा दिवंगत नेते आणि माजी आमदार राजन पाटील यांचे निकटवर्तीय समर्थक असलेले पदाधिकारी माजी उपनगराध्यक्ष स्व.शौकतभाई तलफदार यांनी सांभाळली होती. गत निवडणुकीमध्ये अत्यंत चुरशीने आणि नेटाने प्रभागातील सर्वसामान्यांना विश्वासात घेत या प्रभागाचा गड शौकतभाईनी तलफदार यांनी सर केला होता. ती बाब अजूनही प्रभागातील जनता विसरली नाही. त्यामुळे या प्रभागातून तलफदार परिवारातील सदस्यांने निवडणूक लढवण्याबाबतची मागणी दिवसेंदिवस जोर धरत होती. त्यामुळेच तलबदार परिवाराच्या कुटुंबप्रमुख शहनाज या निवडणुकीच्या रणांगणात उतरण्याची आता निश्चित झाले आहे.

चौकट
केवळ निवडून येऊन स्वस्थ न बसता उपनगराध्यक्ष असलेल्या शौकतभाईंनी माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने यांच्या माध्यमातून शासनस्तरावर पाठपुरावा करत राहून त्यांनी रस्ते पाणी आरोग्य आणि स्मशानभूमी दपनभूमी वॉल कंपाऊंडच्या अनेक बाबींचे प्रश्न सोडवले. त्यामुळे विकासाभिमुख प्रभागाचे नगरसेवक म्हणून उपनगराध्यक्ष शौकतभाई तलफदार यांची त्यावेळी निर्माण झालेली ख्याती आजही लोक विसरले नाहीत. त्यामुळे या प्रभागातील तलफदार परिवाराचे विकासात्मक योगदान विचारात घेता शहनाज तलफदार यांची उमेदवारी राजन पाटील यांच्या भविष्यातील राजकीय रणनीतीच्या दृष्टीने जमिनीची आणि महत्त्वाची ठरणार आहे यातील मात्र शंका नाही.

चौकट
आता स्व.शौकतभाई यांच्या निधनानंतर या प्रभागातून त्यांच्या परिवारातून निवडणूक कोण लढवणार ? याबाबत ही मोठी उत्सुकता होती. त्यानंतर शौकतभाईंचे चिरंजीव युवा नेते एजाजभाई तलफदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील यांची भेट घेऊन या प्रभागातील निवडणुकी संदर्भातील रणनीतीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यांनंतर एजाजभाई यांच्या मातोश्री आणि दिवंगत नेते शौकतभाई यांच्या पत्नी शहनाज तलफदार या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याबाबत निर्णय झाल्याचे समजते.

Reactions

Post a Comment

0 Comments