प्रभाग दहा मधून मेजर तानाजी माने यांची उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वीच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवणारे मेजर माने ठरले पहिले उमेदवार
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या प्रभाग क्रमांक दहा मध्ये उमेदवारी खेचून घेण्यासाठी आरक्षण सोडतीपासूनच्या पहिल्या दिवसापासूनच मोठी रस्सीखेच सुरू होती. पक्षश्रेष्ठी तथा जेष्ठ भाजप नेते माजी आमदार राजन पाटील यांनी प्रभागातील यापूर्वीच्या नगरसेवकांना विश्वासात घेऊन आणि प्रभागातील अन्य पदाधिकारी आणि निष्ठावंत समर्थकांना वेळोवेळी संपर्कात ठेवून या प्रभागातून कोणाला उमेदवारी दिल्यास पक्षाला फायदा होईल याबाबतची चाचपणी केली. या चाचपणीमध्ये प्रामुख्याने मेजर तानाजी माने यांनाच खुल्या प्रवर्गातून उमेदवारी दिल्यास निवडणुकीत मोठा फायदा होऊन हा बालेकिल्ला भाजपच्या ताब्यात राहील असा विश्वास अनेक कार्यकर्त्यांनी अनगर येथे प्रत्यक्ष भेटून व्यक्त केला. त्यानंतर पक्षस्तरावरून मेजर तानाजी माने यांनाच उमेदवारी मिळण्याच्या शक्यतांना बळ प्राप्त झाले.
मेजर तानाजी माने यांची सुपुत्र डॉ. किरण माने आणि त्यांच्या अन्य सहकाऱ्यांनी प्रभागातील प्रत्येक भाग पिंजून काढायला प्रारंभ तर केलाच मात्र प्रभागातील रस्ते पाणी आरोग्य त्याचबरोबर काटेरी बाभळी वाढलेल्या ठिकाणी स्वच्छता विषयी उपक्रम निवडणुकीपूर्वीच पार पाडले. विशेष म्हणजे प्रभागातील ट्रांसफार्मर जळाल्यानंतर पर्यायी पाण्याचा केलेला पुरवठा प्रभागातील सर्वसामान्य लोक आजही विसरले नाहीत. यामुळे निवडणुकीपूर्वी दक्ष असलेला उमेदवार निवडणुकीनंतर निश्चितपणे विकासाभिमुख नगरसेवक होऊ शकतो अशी खात्री या प्रभागातील जनतेला झाल्यामुळे या प्रभागातून सर्वाधिक पाठिंबा आणि प्रतिसाद हा मेजर तानाजी माने यांनाच मिळाला ही बाब आता स्पष्टपणे जाणवत आहे.
चौकट
या प्रभागात समावेशित होणारा यापूर्वीचा प्रभाग क्रमांक १६ हा मोहोळ शहरातील सर्वाधिक विकसित प्रभाग म्हणून ओळखला जातो. या प्रभागाचे प्रतिनिधित्व नगरसेवक सुशील क्षीरसागर यांनी केले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील, बाळाराजे पाटील, अजिंक्यराणा पाटील, सुशील क्षीरसागर यांना मानणारा मोठा वर्ग निश्चितपणे मेजर तानाजी माने यांच्या सोबत असल्यामुळे माने यांचा भविष्यातील निवडणुकीतील विजय सुकर मानला जात आहे.
.jpg)
0 Comments