आता प्रभाग दहा मध्ये उडणार प्रचाराचा मोठा धुरळा
चैतन्य यांनी शिवसेनेचा धनुष्यबाण धरला आणि
निवडणुकीतील पहिलाच उमेदवारी अर्ज भरला
चैतन्य यांच्या उमेदवारीने शिवसेना शिंदे पक्षात नवचैतन्य
मोहोळ (कटूसत्य वृत्त):- सर्वात हाय व्होल्टेज लढत होऊ शकणाऱ्या मोहोळ शहराच्या दक्षिण भागातील प्रभाग क्रमांक दहा मधून शिवसेना शिंदे पक्षाकडून युवा उद्योजक चैतन्य पद्माकरअप्पा देशमुख यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चैतन्य देशमुख हे धनुष्यबाण चिन्हावर या प्रभागातून खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवणार आहेत.
प्रभाग क्रमांक दहा हा पूर्वीचा प्रभाग १६ आणि १७ चा मिळून बनलेला प्रभाग आहे यापूर्वी प्रभाग १६ मधून गतिवेळी देशमुख परिवारातील विक्रम पंडितराव देशमुख यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. केवळ नऊ मतांनी ते पराभूत झाल्यामुळे देशमुख परिवाराचा या प्रभागावरील प्रभाव आजतागायत कायम आहे. त्यामुळे या प्रभागातून चैतन्य देशमुख यांनी खुल्या प्रवर्गातून निवडणूक लढवावी अशी इच्छा प्रभागातील अनेकांची होती आणि त्यांनी पद्माकर अप्पा देशमुख आमदार राजू खरे यांना प्रत्यक्ष भेटून या प्रभागातून चैतन्य देशमुख यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी केली. प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनीही या उमेदवारीला हिरवा कंदील देत जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्याशी चर्चा करून या प्रभागातून चैतन्य देशमुख यांना उमेदवारी जाहीर करत शक्ती प्रदर्शन सुरू केले आहे. चैतन्य देशमुख यांनी अर्ज दाखल केल्यामुळे आता या प्रभागातून प्रस्थापित पक्षांना चैतन्य देशमुख धनुष्यबाण चिन्ह हातात घेऊन लढत देणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे.
चौकट
पद्माकरआप्पा देशमुख स्वतःच शेलार मामाची भूमिका बजावणार
शिवसेनेचे युवा नेते चैतन्य देशमुख यांनी आमदार राजू खरे, शिवसेना शिंदे पक्षाचे ओबीसी विभागाचे राज्याचे नेते प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेशदादा पाटील, चैतन्य यांचे वडील आणि राजकीय मार्गदर्शक पद्माकर आप्पा देशमुख यांच्या मार्गदर्शन आणि वैचारिक पाठबळावर त्यांनी या प्रभागातून आपला उमेदवारी अर्ज गुरुवार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी दाखल केला आहे.
या निवडणूक प्रक्रियेचा पहिलाच अर्ज चैतन्य देशमुख यांनी दाखल करत मोहोळ शहराच्या राजकारणात चर्चेच्या केंद्रस्थानी राहण्यामध्ये यश मिळवले आहे.
.jpg)
0 Comments