Hot Posts

6/recent/ticker-posts

गेल्या दोन दशकांपासूनच्या निष्ठेची पक्षश्रेष्ठी कदर करतील अशी प्रभाग १० मधील सागर लेंगरे समर्थकांना आशा

 गेल्या दोन दशकांपासूनच्या निष्ठेची पक्षश्रेष्ठी कदर करतील अशी प्रभाग १० मधील सागर लेंगरे समर्थकांना आशा




सारिका सागर लेंगरे यांच्या उमेदवारीसाठी प्रभागातील चाचपणीनंतर निश्चितीच्या हालचाली

मोहोळ (कटूसत्य वृत्त):-

गेल्या दोन दशकापासून भारतीय जनता पक्षासाठी अविरतपणे झटणाऱ्या लेंगरे परिवारातील युवा नेते तथा युवा उद्योजक एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे काम करताना प्रचंड हालापेष्ठा आणि त्रास सहन केलेल्या सागर लेंगरे यांच्या सुविदय पत्नी सारिका लेंगरे यांना प्रभाग दहा मधून ओबीसी महिला प्रवर्गातून उमेदवारी मिळावी यासाठी लेंगरे परिवाराने ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांना साकडे घातले आहे. 

आता कोणत्याही क्षणी या प्रभागातील उमेदवारी निश्चिती होऊन उमेदवारी अर्ज दाखल करावे लागणार आहेत. त्यापूर्वी स्वतः युवा उद्योजक तथा पक्षाचे निष्ठावंत युवा नेते सागरदादा लेंगरे, त्यांचे बंधू युवा उद्योजक समाधान लेंगरे यांनी अनगर येथे जाऊन पक्षश्रेष्ठी राजन पाटील यांची भेट घेऊन उमेदवारी परिवारातील सदस्याला मिळण्याची विनंती केली.
 सागर लेंगरे हे गेल्या अनेक वर्षापासून या प्रभागातील सक्रिय आणि लढवय्ये भाजप कार्यकर्ते म्हणून सर्वांना परिचित आहेत. केवळ जिल्ह्यातीलच नाही तर राज्यातील भाजपच्या पक्षश्रेष्ठींशी त्यांचा असलेला नित्यसंपर्क आणि आपुलकीचा सुसंवाद हा त्यांना आजवरच्या राजकारणामध्ये यशस्वी करताना उपयोगास आला आहे. आता सागर लेंगरे यांच्या सुविद्य पत्नी सारिका लेंगरे यांना उमेदवारी मिळावी अशी लेंगरे परिवाराची देखील अपेक्षा असणे स्वाभाविक आहे. मात्र सागर लेंगरे यांच्या उमेदवारीमुळे गाढवे वस्ती, माने वस्ती आणि सागर लेंगरे स्वतः वास्तव्यास असलेला सुळे नगर परिसरातील मोठे मतदान हे लेंगरे यांच्या पत्नीं सारिकांना मिळणार असल्यामुळे सागर लेंगरे यांच्या परिवाराची उमेदवारी भाजपाच्या दृष्टीने जमेची बाब ठरणार आहे.

चौकट
गत आठवड्यामध्ये राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहत गेले. त्यामुळे या प्रभागातील उमेदवाऱ्या ह्या एकाच भागात दिल्या जाऊ नयेत असा काहीसा सूर शहरातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठीं जवळ अळवला. त्यानंतर पक्षश्रेष्ठींनी प्रभागातील सर्वसामान्यांना विश्वासात घेऊनच उमेदवारी निश्चित केली जाईल असा शब्द दिल्यामुळे सागर लेंगरे यांना आता मोहोळ शहरातील भागाच्या अनुषंगाने एक उमेदवारी गाढवे वस्ती माने वस्तीवरून आणि दुसरी उमेदवारी शहरातून मिळेल अशी अपेक्षा आहे. आता सर्वांचे लक्ष पक्षश्रेष्ठी राजन पाटील आणि या प्रभागाचे यापूर्वीचे प्रतिनिधी सुशील क्षिरसागर यांच्या भूमीकेकडे लागले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments