Hot Posts

6/recent/ticker-posts

मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर जिल्ह्यातील मिशन लोटसकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष

 मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे सोलापूर जिल्ह्यातील मिशन लोटसकडे पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष



सोलापूर जिल्ह्यातील पालकमंत्री ना. जयाभाऊ गोरे यांच्या पॉवरमोडमुळे मोहोळ मतदार संघातील अनगरकर -पाटील ॲक्टिव मोडमध्ये

अनगर आणि मोहोळ नगरपंचायतीमध्ये दोन्ही नगराध्यक्षांबरोबर जास्तीत जास्त जागा जिंकण्याची भाजपची रणनीती

मोहोळ (साहिल शेख):- सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची धुरा सांभाळल्यापासून राज्याचे ग्रामविकास तथा पंचायतराज खात्याचे कॅबिनेट मंत्री ना जयकुमार गोरे यांनी मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्याला भारतीय जनता पक्षाच्या सामर्थ्याचा बालेकिल्ला बनवण्यासाठी सुरू केलेली रणनीती आता यश मिळवताना दिसत आहे. पक्षांमध्ये विक्रमी इनकमिंग करत परफेक्ट पॉलिटिकल मोड धारण करणारे ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले यशस्वी रणनीतीचे पालकमंत्री ठरत आहेत. माजी जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे विद्यमान आमदार सचिनदादा कल्याणशेट्टी यांच्या सह विचाराने त्यांनी भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्याचा घेतलेला निर्णय निश्चितपणे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने प्रेरणादायी म्हणावा लागेल.


काही दिवसापूर्वी अनगरकरांना नगरपरिषद निवडणुकीत चार ते पाच जागा जिंकता येतील असे दावे करणारे प्रख्यात राजकीय विश्लेषक आता मूग गिळून गप्प बसले आहेत. कारण सध्या शहरात सुरू असलेली राजकीय धावपळ अप्रत्यक्षरीत्या अनगरकरांची पॉलिटिकल इमेज वधारत असल्याची साक्ष देत आहे. अनगरकरांच्याच नेतृत्वाखाली भाजपकडून उमेदवारी मिळवण्यासाठी मोहोळ ते अनगर दररोज अनेक इच्छुक उमेदवार दुचाकीवरून कित्येक तास वाऱ्या करत आहेत. एकेकाळी त्यांच्या विरोधात प्रस्थापित पक्षात असलेले आणि त्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल टीकाटिपनी करणारे त्यांनी प्रवेश केलेल्या पक्षातील विरोधक आता त्यांच्या अवतीभवती उभे राहून सेल्फी काढताना पाहून अनगरकरांना मानणाऱ्या समर्थकांचे मन देखील सुखावून जात आहे.साधी राहणी अन उच्च विचारसरणीच्या राजन पाटील यांना भेटायचे म्हटले तर गर्दीमुळे वेळच मिळेना झाला आहे. त्यामुळे त्यांच्या राजकीय निवृत्तीची वाट पाहणाऱ्या व्यक्तीद्वेष करणाऱ्या विरोधकांना आता त्यांची या जेष्ठ वयोमानातील राजकीय रणनीती आणि प्रगल्भ व्युहरचना पाहून काहीच सूचना असे झाले आहे त्यामुळे यापूर्वी चुरशीची वाटणारी निवडणूक येत्या काही दिवसात एकतर्फी झाल्यास नवल वाटायला नको. राजन पाटील यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील उमेदवारी निवडीच्या रणनीतीचा ताण आल्यामुळे अनगरकरांच्या संपर्क यंत्रणेवर भरोसा असलेले अनेक जण लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील यांची भेट घेऊन पक्षाच्या विचारधारेत समाविष्ट होऊन काम करण्याची इच्छा व्यक्त करत आहे. ही अनगरकरांच्या दृष्टीने निश्चितपणे बेरजेची बाब म्हणावी लागेल.
भारतीय जनता पक्षाने राजन पाटील यांना पक्षात खेचून घेत पुढच्या वीस वर्षातील राजकीय रणनीतीचा कानोसा घेत केलेला प्रगल्भ अभ्यास निश्चितपणे येत्या काळातील पक्ष संघटनात्मक बाबींना हितावह ठरणार आहे यातील मात्र शंका नाही.

चौकट
एकेकाळी ज्या भाजपाची मोहोळ तालुक्यात साधी एक ग्रामपंचायत देखील ताब्यात नव्हती त्या मोहोळ तालुक्यात आज भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी घेऊन निवडणूक लढवण्यासाठी शेकडो युवकांची गर्दी होत आहे ही बाब नक्कीच पक्षाच्या येत्या काळातील संघटनात्मक वाटचालीच्या दृष्टीने महत्त्वाची म्हणावी लागेल.भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यापासून अनगरकर -पाटील परिवार येत्या काळात होणाऱ्या नगरपरिषद आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या निमित्ताने आता चांगलाच ॲक्टिव्ह होऊन पॉवरमोड मध्ये आल्याचे सर्वांना जाणवत आहे. अनगरकरांचे भाजपमध्ये इन्कमिंग झाल्यापासून अनगरकरांच्या अनगर येथील नगरपंचायत कार्यालयाच्या संपर्काच्या ठिकाणी आणि लोकनेते कारखान्यावर इच्छुक उमेदवार आणि राजकीय पदाधिकाऱ्यांची वर्दळ तब्बल दहा पटीने वाढली आहे. 

चौकट
एकेकाळी अनगरकरांच्या ताब्यातून राजकारण निसटले आहे अशा वल्गना करणारे अनेक जण अनगरकरांच्या नेतृत्वाखाली भाजपमधुन उमेदवारी मिळवण्याच्या रांगेत उभे असल्याचे समजते. गेल्या दोन महिन्यापूर्वी नगरपरिषद निवडणुकीच्या पूर्वावातावरण निर्मितीमध्ये अनगरकर -पाटील परिवारांच्या राष्ट्रवादीला तिसऱ्या स्थानावर काही विश्लेषकांनी नेऊन ठेवले होते. आज तेच अनगरकर पाटील स्वतःचा सेल्फ पॉवर मोड ऍक्टिव्हेट केल्यामुळे मोहोळच्या पॉलिटिकल कॅलीबरमुळे आता नंबर वन वर आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments