प्रभाग १० मधून मेजर तानाजी माने यांनी समर्थकांसह उपस्थित राहून दाखल केला उमेदवारी अर्ज
भारतीय जनता पक्षाकडून त्यांनाच संधी मिळण्याचा प्रभागातील त्यांच्या समर्थकांना ठाम विश्वास
देशसेवा केलेल्या मोहोळच्या सुपुत्राला मिळणार नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्यांची सेवा करण्याची संधी
मोहोळ (साहील शेख):- भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारीचे पत्ते आज दिवसभरात खुले होणार असल्यामुळे कोणत्या प्रभागात कोणाकोणाला संधी मिळणार ? याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. मोहोळ शहराच्या दक्षिण हद्दवाढ भागातील राजकीय दृष्ट्या चर्चेत असलेल्या प्रभाग क्रमांक दहा मधून खुल्या प्रवर्गातून मेजर तानाजी माने यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे या प्रभागातील संपूर्ण राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. मेजर तानाजी माने यांच्या उमेदवारी प्राप्त होण्याचे पारडे पहिल्या दिवसापासून आजतागायत जड आहे. या प्रभागातील अनेक क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी पक्षश्रेष्ठींना भेटून मेजर तानाजी माने यांनाच उमेदवारी देण्याची मागणी केल्यामुळे पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या उमेदवारीला हिरवा कंदील दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
काल दिनांक १६ नोव्हेंबर रोजी मेजर तानाजी माने यांनी आपल्या शेकडो समर्थकासह मोहोळ शहरात दमदार एन्ट्री करत निवडणूक निर्णय अधिकारी यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी गेल्या काही दिवसापूर्वी मेजर माने यांनी भाजपचे पक्षश्रेष्ठी तथा माजी आमदार राजन पाटील, जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, तालुकाध्यक्ष सतीश काळे, निवडणूक प्रभारी सुशील भैय्या क्षीरसागर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून आपला उमेदवारी अर्ज सर्व प्रशासकीय कागदपत्रांची पूर्तता करत निवडणूक निर्णय अधिकारी सुपूर्द केला.
चौकट
सुरुवातीपासूनच या प्रभागात मेजर माने आणि त्यांच्या परिवाराचे कार्य अत्यंत उल्लेखनीय आणि गौरवास्पद असल्यामुळे त्यांनाच उमेदवारी प्राप्त होण्याचा विश्वास त्यांच्या समर्थकांना आहे. त्यांचे सुपुत्र डॉ. किरण माने आणि त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांनी या प्रभागातील जनसंपर्क मोठ्या प्रमाणात भर वाढवण्याबरोबर पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन करण्यामध्ये देखील यश मिळवले आहे.एव्हीएस उद्योग समूहाच्या माध्यमातून शेकडो बेरोजगारांच्या हाताला काम देण्याबरोबर लाखो लिटर दूध संकलनाच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या आर्थिक उन्नतीसाठी दूध उद्योगाच्या माध्यमातून त्यांनी केलेली धडपड संपूर्ण प्रभागाने आणि शहराने पाहिली आहे. देशसेवा केलेल्या मोहोळच्या या सुपुत्राला नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी भारतीय जनता पक्षाकडून मिळणार असल्यामुळे या प्रभागातील त्यांच्या समर्थकांत उत्साहाचे वातावरण आहे.

0 Comments