गावांचा विकास करण्यासाठी भाजपा च्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा- शशिकांत नाना चव्हाण
कुरुल (कटूसत्य वृत्त):- प्रथम राष्ट्र नंतर पक्ष व स्वतः पुन्हा हे ब्रीद घेऊन भारतीय जनता पार्टी जनमानसात उतरली आहे. देशामध्ये नरेंद्र आणि राज्यांमध्ये देवेंद्र हे नेतृत्व विकासाची नवी भरारी घेत आहे. २०१४ पासून नवा देश घडत असलेला देश आपल्याला पाहावयास मिळत आहे. गावागावांमध्ये एकही नागरिक उरला नसेल की त्याने भाजपा च्या विकासाचा लाभ घेतला नसेल. त्यामुळे येणाऱ्या काळात भरीव व भक्कम विकासासाठी भाजपच्या पाठीशी ठामपणे व खंबीरपणे उभे राहा नक्की आम्ही गावांचा विकास करू असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांनी केले.
भाजपा जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भाजपा युवा तालुकाध्यक्ष अंकुश भैय्या अवताडे व संगीता सुखदेव अवताडे यांनी विरवडे बुद्रुक व कामती जिल्हा परिषद गटातील नागरिकांना किट वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर पंचायत समिती माजी सदस्य अजिंक्यराणाजी पाटील, माजी जिल्हाध्यक्ष शंकर नाना वाघमारे, मंगळवेढ्याचे माजी तालुकाध्यक्ष राजेंद्रजी सुरवसे, आयोजक संगीता आवताडे, लोकनेते शुगरचे संचालक संभाजी राजे चव्हाण, संतोष सावंत, गोपाळ शेळके, आबासाहेब चटके, युवराज अवताडे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजिंक्यराणा पाटील म्हणाले की, भाजपा हा सर्वसामान्य लोकांच्या हिताचा विचार करणारा पक्ष आहे. अंकुश भैय्या यांनी घेतलेला सामाजिक उपक्रमाचा कार्यक्रम हा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. येणाऱ्या काळात कधीही हाक द्या, 24 तास आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध असून असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.
यावेळी सोमनाथ खराडे, ज्ञानेश्वर पाटील, ग्रा.पं. सदस्य महेश अवताडे, रमेश वामन अवताडे, डॉ. शंकर अवताडे, महादेव बाळासाहेब आवताडे, समाधान दादा अवताडे, लहू तात्या अवताडे, संदिप बापु अवताडे, सचिन संभाजी अवताडे, योगेश अवताडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन मिसाळ यांनी केले या कार्यक्रमाला विरवडे बुद्रुक पंचक्रोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.

0 Comments