Hot Posts

6/recent/ticker-posts

यात्रा कालवधीमध्ये व गर्दीच्या ठिकाणी जीबीएस आजाराच्या अनुषंगाने अन्नसुरक्षा ची काळजी घ्यावी - साहेबराव देसाई

 यात्रा कालवधीमध्ये व गर्दीच्या ठिकाणी जीबीएस आजाराच्या अनुषंगाने

 अन्नसुरक्षा ची काळजी घ्यावी  - साहेबराव देसाई

 

सोलापुर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरचे ग्रामदैवत श्री. सिध्देश्वर यात्रा दिनांक 12 जानेवारी 2025 पासुन सुरू आहे. तसेच पंढरपुर येथे होणारी दिनांक 2 फेब्रुवारी 2025 ते 12 फेब्रुवारी 2025 माघ वारी सुरु होत आहे. या दोन्हीही यात्रा कालावधीमध्ये सर्व हॉटेल चालक व अन्न विक्रेते यांनी ग्राहकांना विना भेसळ अन्नपुरवठा करावा तसेच पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करावे, असे निर्देश अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिले.


       यात्रा कालावधीमध्ये व गर्दीच्या ठिकाणी सर्व अन्न व्यावसायिक जसे की, हॉटेल, रेस्टॉरंट, हातगाडे, फिरते विक्रेते, ज्युस सेटर, स्थायी व अस्थायी स्टॉल इत्यादींनी खाली दिलेल्या सुचनांचे पालन करून ग्राहकांना स्वच्छ, निभेंळ, सकस, ताजे अन्न पदार्थाची विक्री करण्यात यावी. हॉटेल चालक व अन्य विक्रेते यांनी खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. चला पुढील प्रमाणे....


 1.स्वच्छ व निर्जंतुक पिण्यायोग्य पाण्याचा पिण्यासाठी तसेच अन्न पदार्थ बनविण्यासाठी वापर करावा.

2. ग्राहकांना केवळ ताजे अन्न पदार्थाचीच विक्री करावी. कोणत्याही परिस्थीतीत शिळे, बुरशी आलेले,

    मुदतबाह्य, विटलेले अन्न पदार्थाची विक्री करू नये व सेवन करू नये, अशा प्रकारच्या अन्न पदार्थंची योग्य पध्दतीने विल्हेवाट लावावी.

3.अन्न पदार्थ बनवताना स्वच्छ वातावरणात व स्वच्छ जागेमध्ये तयार करावेत.

4.तयार अन्नपदार्थ हे नेहमी झाकून ठेवलेले असावेत जेणेकरून त्यावर धुळ, कीटक, माशा बसणार नाहीत   व अन्न पदार्थ दुषित होणार नाही याची काळजी घ्यावाी.

5.उघड्यावरील व माशा, कीटक, धुळ बसलेले अन्न पदार्थाचे सेवन करण्यात येऊ नये.

6. अन्न पदार्थ व इतर खाद्यपदार्थ खरेदी करताना परवानाधारक नोंदणीधारक आस्थापना कडूनच खरेदी  करावेत.

7. दुध व दुग्धजन्य अन्नपदार्थ हे ताजे व योग्य तापमानात साठवणूक केलेले योग्य कालावधी मध्येच सेवन करावे.

8.अन्न विषबाधा होणार नाही याची खबरदारी घ्यावी.


            सदर यात्रा कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही, तसेच जीबीएस आजाराच्या अनुषंगे अन्न सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती खबरदारी घ्यावी याबाबत सर्व नागरिकांनी व अन्न व्यावसायिकांनी काळजी घेऊन प्रशासनास सहकार्य करण्यात यावे असे आवाहन अन्न व औषध प्रशासनचे सहायक आयुक्त साहेबराव देसाई यांनी केले आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments