Hot Posts

6/recent/ticker-posts

अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 66 लाख 16 हजाराची सुगंधीत तंबाखू जप्त

 अन्न व औषध प्रशासनाची कारवाई; 

66 लाख 16 हजाराची सुगंधीत तंबाखू जप्त

सोलापूर,  (कटूसत्य वृत्त):- मौजे.कामती येथे एमएच-40, एके-8993  हे वाहन मंद्रुप रोडवरून मोहोळकडे संशयितरित्या येताना दिसले सदर वाहनास थांबवून चौकशी करून वाहनाची तपासणी केली असता  त्यामध्ये विमल पानमसाला 2000 बॉक्स, व्हि-1 सुगंधित तंबाखु 2000 बॉक्स, विमल पानमसाला-24000 पाकिटे, व्हि-1 सुगंधित तंबाखु- 24000 पाकिटे व  विमल पानमसाला-1800 पाकिटे असे प्रतिबंधित अन्न पदार्थ  एकूण 66 लाख 16 हजार 600  रुपयाचा चा साठा जप्त करण्यात आला.


              सदर प्रकरणी अन्न सुरक्षा अधिकारी यांनी अन्न सुरक्षा व मानदे कायद्यांतर्गत पुढली कारवाई करण्यात आली असून,  वाहन चालक विजय शिवानंद कंबार, रा. आझाद रोड, आळणावर, धारवाड कर्नाटक, साठा मालक सुजित खिवसारा, रा पुणे 3. वाहन ट्रान्सपोर्टर मालक रफिक मेनन, वाहन मालक श्रीमती लक्ष्मी सुनिल रहागडाले यांचे विरूध्द कामती पोलिस स्टेशन, कामती येथे फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे.


सदरची कारवाई सहायक आयुक्त सुनिल जिंतुरकर तसेच अन्न सुरक्षा अधिकारी अशोक इलागेर, मंगेश लवटे, उमेश भुसे व नमुना सहायक श्रीशैल हिटनळ्ळी यांच्या पथकाने पुर्ण केली आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments