महात्मा गांधीजींनी ग्रामोद्योगातून स्वावलंबी जीवनाचा संदेश दिला- मल्लिनाथ कल्याणशेट्टी
अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- महात्मा गांधीजींनी स्वदेशी, ग्रामोद्योग, सुत कताईतून स्वावलंबी जीवन जगण्याचा संदेश दिला त्यामुळे श्रमाला प्रतिष्ठा मिळाली त्यांचे हेच विचार युवकांनी अंगीकारले पाहिजेत असे प्रतिपादन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.
महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्था संचलित मातोश्री गुरुबसव्वा कल्याणशेट्टी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महात्मा गांधी जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ राजेंद्रसिंह लोखंडे, पुनम कोकळगी, मुख्याध्यापक मलकप्पा भरमशेट्टी उपस्थित होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आजचा युवक विघातक शक्तीच्या पाठीमागे धावत आहे, त्यामुळे त्याच्या जीवनाची घडी बिघडत चालली आहे, त्याने गांधीजीनी सांगीतलेल्या मार्गाने वाटचाल करावी, त्यांचा स्वावलंबी जीवनाचा मंत्र स्वीकारून श्रमाला प्रतिष्ठा दिली तर जीवन सुखकर होईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ एस आर लोखंडे यांनी केले सूत्रसंचलन सौरभ भस्मे यांनी केले आभार डॉ शितल झिंगाडे भस्मे यांनी मानले कार्यक्रमास प्राध्यापिका सौंदर्य शास्त्री, जनाबाई चौधरी, शीतल फुटाणे, ऐश्वर्या तारापुरे, शिवकुमार मठदेवरु, गुरुशांत हपाळे उपस्थित होते.
चौकटीतील मजकूर
साबरमतीला गेल्यामुळे जीवन कृतार्थ झाले
गांधीजींचे जन्म ठिकाण पोरबंदर व साबरमती आश्रमात जाण्याचा योग आला तेथे गेल्यानंतर गांधीजींच्या भव्य कार्याचे दर्शन झाले अन् आपले जीवन कृतार्थ झाले अशी भावना मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी व्यक्त केली.

No comments:
Post a Comment