अकलूज येथे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर... - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 5, 2026

अकलूज येथे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर...

 अकलूज येथे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर...

रुग्ण सेवेच्या नावाखाली चिरफाड तर रक्तरंजित उपचार..?



अकलूज (विलास गायकवाड):- अकलूज-संग्रामनगर परिसरातील,आलिशान आणि प्रशस्त असणाऱ्या काही हॉस्पिटलमध्ये, रुग्णसेवेच्या नावाखाली चिरफाड आणि रक्तरंजित उपचार होत आहेत का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत. यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, संबंधित हॉस्पिटलची सखोल चौकशी करावी अशी मागणी लेखी तक्रारीद्वारे आरोग्य विभागाकडे  करण्यात आली आहे. परंतु आरोग्य विभागाकडून मिळणारा संमिश्र प्रतिसाद आणि कासव गतीने चाललेली चौकशी संशयास्पद वाटत असून,जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा समन्वयक अधिकारी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, यांनी अत्यंत गंभीर असणाऱ्या विषयाकडे लक्ष केंद्रित करावे अशी मागणी होत आहे.
            आपुलकी आणि विश्वासाचं दुसरं नातं म्हणजे डॉक्टर असतात. सर्वसामान्य जनता दैव अवतार म्हणून डॉक्टरकडे पहात असते.सर्वच डॉक्टर माणुसकी सोडून वागतात असे म्हणणे चुकीचे आहे. काही डॉक्टर माणुसकीच्या पलीकडे जाऊन रुग्ण सेवा करतात.तिथे बिलाचा विचार करत नाहीत.
फक्त रुग्णांचा विचार करतात. कोरोना महामारीच्या वेळी अनेक डॉक्टरांनी, स्वतःच्या जीवाची बाजी लावून, कित्येक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. प्रामाणिकपणे रुग्णांची सेवा करत असताना, कित्येक डॉक्टर स्वतःही कोरोनाच्या विळख्यात सापडले होते आणि हे सत्य आहे;  ते नाकारता येणार नाही!
        लोक म्हणतात,अकलूज  शहर हे वैद्यकीय दुनियेतील माहेर घर आहे. लोकवस्ती कमी पण हॉस्पिटलची संख्या आवाक्या बाहेर आहे. विविध प्रकारचे तज्ञ रुग्णांसाठी इथे तत्पर आहेत. स्वतःचे हॉस्पिटल असताना, व्यवसायाच्या दृष्टिकोनातून चार-पाच जण तज्ञ डॉक्टर, एकत्रित येऊन,भले मोठे आवाढव्य असे हॉस्पिटलची निर्मिती करतात. सदर हॉस्पिटल मध्ये शासकीय योजना राबवतात आणि येथूनच सुरुवात होते एका नव्या पर्वला..? शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी, गरज नसताना, रुग्णांवर शस्त्रक्रिया केली जाते असे कथित आरोप होत आहेत. जिथे खरोखरच गरज आहे, तिथे शस्त्रक्रिया झालीच पाहिजे. परंतु गरज नसताना, चिरफाड आणि रक्तरंजित उपचार करणे म्हणजे, रुग्णांच्या जीवाशी खेळणे म्हणावे लागेल?हे केवळ शासकीय योजनांचा अर्थलाभ घेण्यासाठी म्हणावे का? संबंधित एका हॉस्पिटलने मागील पाच सहा वर्षात 23 कोटी 27 लाख 87 हजार 882 रुपये एवढ्या रक्कमेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे. याचा अर्थ काय समजावा, बोगस रुग्ण?बोगस बिले? का बोगस शस्त्रक्रिया? सखोल चौकशीअंती छडा लागेल;तर सदर हॉस्पिटल डॉक्टरांच्या नावासह प्रकाश झोतात येतील यात शंका नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages