डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ येथील चार्जिंग स्टेशनला महापौर व पदाधिकाऱ्यांची भेट - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Monday, October 5, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ येथील चार्जिंग स्टेशनला महापौर व पदाधिकाऱ्यांची भेट

 डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ येथील चार्जिंग स्टेशनला महापौर व पदाधिकाऱ्यांची भेट




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक आणि नागरिकांसाठी सुविधाजनक करण्याच्या दृष्टीने महानगरपालिका प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरासाठी प्रस्तावित नवीन ई-बस सेवेसंदर्भात महापौर विनायक कोंड्याल यांनी आज डॉ बाबासाहेब आंबेडकर वाहन स्थळ चार्जिंग स्टेशन या ठिकाणी सदिच्छा भेट दिली पहाणी केली. 

या वेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृहनेते नरेंद्र काळे, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे,नगरसेवक गौतम कसबे, परिवहन व्यवस्थापक सारिका आकुलवार यांच्यासह संबंधित अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
 महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह उपस्थित पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळ येथे भेट देऊन ई-बससाठी उभारण्यात आलेल्या चार्जिंग स्टेशनला भेट दिली. यावेळी चार्जिंग स्टेशनची व्यवस्था, उपलब्ध सुविधा तसेच ई-बसच्या संचालनासाठी आवश्यक असलेल्या विद्युत व्यवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली.

ई-बसच्या नियमित संचालनासाठी आवश्यक असलेल्या चार्जिंग तसेच देखभाल-दुरुस्तीच्या सुविधांची तयारी याबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली. ई-बस सेवा सुरू झाल्यानंतर नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सुविधा सक्षम करण्यावर भर देण्यात आला.

महापालिका परिवहन व्यवस्थेचे नियोजन अधिक प्रभावी करताना शहरातील नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाच्या गरजा लक्षात घेऊन ई-बसचे मार्ग व संचालनाचे नियोजन करण्यात येणार आहे. नवीन ई-बस सेवा लवकरात लवकर नागरिकांच्या सेवेत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने कार्यवाही करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages