साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर सुशोभीकरण कामात कुठलीही कमतरता ठेवणार नाही — नगरसेविका श्रीदेवी फुलारे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 6, 2026

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर सुशोभीकरण कामात कुठलीही कमतरता ठेवणार नाही — नगरसेविका श्रीदेवी फुलारे

 साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा परिसर सुशोभीकरण कामात कुठलीही कमतरता ठेवणार नाही — नगरसेविका श्रीदेवी फुलारे




(कटूसत्य वृत्त):-  नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या निधीतून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळा परिसरात हॅलोजन लाईट बसविण्याचे तसेच फरशीकरणाचे काम पूर्ण केले. या कामाबद्दल सकल मातंग समाज, सोलापूर व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे मध्यवर्ती समिती सोलापूर यांच्या वतीने लष्कर मातंग समाजाचे अध्यक्ष भीमराव दाजी गायकवाड यांच्या हस्ते नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांचा सत्कार करण्यात आला.या कामासाठी सकल मातंग समाज, महाराष्ट्र राज्याचे समन्वयक सुरेश पाटोळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला.

    यावेळी लहुजी शक्ती सेनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष महादेव भोसले, युवा नेते विश्वास शिंदे, क्रांतिवीर लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश युवक कार्याध्यक्ष गोविंद कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष संजय साठे, किशोर जाधव सर, शरद अष्टूळ, विश्वनाथ पाटोळे, मिनेश बोराडे, विसवेश्वर गायकवाड, शिवाजी पाटोळे,महेश जोगदंड आदित्य पारधे, ओंकार पाटोळे,आदींची प्रमुख उपस्थिती होती.

   नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी सांगितले की, “महापुरुषांच्या विचारांमुळे समाजाची प्रगती होत असते. त्यांचे पुतळे समाजाला दिशादर्शक ठरतात. अण्णाभाऊ साठे यांनी बहुजन समाजात जागृती घडवून आणली. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वसा पुढे घेऊन जाण्यासाठी सोलापूर शहरातील हा अण्णाभाऊंचा पुतळा प्रेरणा देत राहणार आहे. माझ्या प्रभागात येणाऱ्या साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामात कोणतीही कमतरता ठेवणार नाही.”

   कार्यक्रमाचे प्रास्ताविक सकल मातंग समाजाचे राज्य समन्वयक सुरेश पाटोळे यांनी केले. सूत्रसंचालन गोविंद कांबळे यांनी केले, तर आभार महादेव भोसले यांनी मानले.

आपला 

किशोर जाधव

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages