एका दिवसात महाराष्ट्र बंद नाही केला तर नाव बदलेन- जरांगे पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, October 6, 2026

एका दिवसात महाराष्ट्र बंद नाही केला तर नाव बदलेन- जरांगे पाटील

 एका दिवसात महाराष्ट्र बंद नाही केला तर नाव बदलेन- जरांगे पाटील




पुणे (कटूसत्य वृत्त):- एमपीएससीच्या अध्यक्षाच्या राजीनाम्यासाठी तसेच आपल्या इतर काही मागण्यांसाठी पुण्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे.

या आंदोलनाला आता मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भेट दिली. यावेळी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. तुमच्यासाठी सगळा महाराष्ट्र बंद करू असा इशाराही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

नेमकं काय म्हणाले जरांगे पाटील?

महाराष्ट्रमध्ये जे जे कायं होतंय. ते तरुणांच्या हिताचं होतंय. माझं पुण्यनगरीतून सगळ्या विद्यार्थ्यांना आवाहन आहे, तुम्हाला थोडाही कलंक लागू नये, तुमचे आई-वडील तुमची घरी वाट पहात आहेत. मुलाला नोकरी मिळाली तर कितीही दुष्काळचं संकट आलं तरी काही फरक पडणार नाही. यांना मस्ती आली आहे, तुमच्यासाठी सारा महाराष्ट्र बंद करतो, असं यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच हे आंदोलन राजकीय कसं काय? विद्यार्थ्यांना बळ दिलं नाही पाहिजे का? असा सवालही यावेळी जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.

मला सकाळपासून फोन चालू आहेत, तिकडे जाऊ नको. मला कायं विकत घेतलं की कायं तुम्ही. कशालाही फोन करता. मी डोक्यावर घेतले होते. आपले आपले म्हणून. मी जर जातीवादी असतो तर इकडे आलो नसतो. राजीनामा द्यावाच लागेल, काय नाव ठेवलं तर भीमनवार नाव पाट करता करता मला दोन दिवस लागले असं म्हणत त्यांनी यावेळी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्यावर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. फडणवीस तुम्ही त्यांचे प्रवक्ते म्हणून काम करता का? सरकारने त्यांना एक दिवसात काढून टाकावे, आहे गरीबाचा पण एकटा लढतो. महाराष्ट्र बंद नाही केला तर नाव बदलून टाकीन, गरीबाची मुलं अधिकारी होऊ नये असं तुम्हाला वाटतं का? तुम्ही गरिबांच्या आई-वडिलांनी पाहिलेल्या स्वप्नांचा चुराडा करत आहात, असंही यावेळी जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages