अन्नछत्र मंडळाच्यावतीने ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 16, 2026

अन्नछत्र मंडळाच्यावतीने ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप

 अन्नछत्र मंडळाच्यावतीने ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप




अक्कलकोट (कटूसत्य वृत्त):- श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जनमेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व न्यासाचे कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे जनमेजयराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आणि संकल्पनेतून तालुक्यातील सराव करण्याऱ्या गोरगरीब ‘कुस्तीगरांसाठी स्वामींचा प्रसाद रुपी खुराकाचे कीट वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत न्यासाकडून ऑक्टोबर महिन्यातील ७७ कीटचे वाटप गुरुवारी करण्यात आले.

तालुक्यातील जे पैलवान कुस्ती सरावासाठी कोल्हापूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर आदि ठिकाणी आहेत अशा कुस्तीगरांसाठी न्यासाकडून गत मकर संक्रांतीच्या दिवशी (जानेवारी - 2024या महिन्यात) सदरचा उपक्रम सुरू करण्यात आला होता. प्रारंभी ५० जणांना किट देण्यात आले होते.

अमोलराजे ग्रुप पैलवानांचा डंका –
यामध्ये ८ पैलवान राज्यासह परराज्यात राष्ट्रीय पातळी पर्यंत चमकले आहेत. यामध्ये नेत्रदीपक प्रगती पै.पुरषोत्तम कुलकर्णी, पै. शशिकांत जुमाले, पै.मशीद शेख, पै.विकास बनसोडे यांनी राज्य हिंद केसरी स्पर्ध्येपर्यंत मजल मारली आहे. महिला पैलवाना मध्ये पै. अंकिता भिवा जाधव महिला राष्ट्रीय कुस्ती स्पर्ध्येमध्ये गोल्ड तर पै. सावित्री बनसोडे हिने देखिल गोल्ड मिडल पटकविले आहे. या बरोबरच वेदिका सासणे हिने हरयाणा, राजस्थान, रांची, झारखंड येथील राष्ट्रीय स्पर्ध्येपर्यंत मजल मारली आहे. या बरोबरच कु. नागम्मा बजे हिने बांबू उडीत राष्ट्रीय स्तरावर विविध पारितोषक मिळविले आहे. तर प्रदीप माने याने बालेवाडी क्रीडा नगरीत धावण्याचा सराव करीत असून, तो शासनाच्या मिशन लक्षवेध योजनेत समावेश असून त्याने राष्ट्रीय अंतरराष्ट्रीय स्पर्ध्येकरिता सरावार्थ पुणे येथे प्रशिक्षण घेत आहे.

तालुक्यातील कुस्तीगीर हे सरावाकरिता कोल्हापूर, पुणे, सोलापूर, धाराशिव, संभाजीनगर आदि ठिकाणी कुस्तीचा सराव करीत आहेत. मात्र त्यांची गरज ओळखून तालुक्याच्या चांद्या पासून बांध्यापर्यंतच्या कुस्तीगरांचा एका विशेष टीमच्या माद्यमातून सर्वे करून तालुक्यातील ७७ पैलवानांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान याकामी महाराष्ट्र केसरी पै.मौला शेख बादोला, पै.महेश कुलकर्णी, सरफराज शेख, अतिश पवार यांचे सहकार्य लाभले.

याप्रसंगी न्यासाचे सचिव शामराव मोरे, भिवा जाधव, पै. महेश कुलकर्णी, अतिश पवार, प्रवीण घाटगे, शुभम सावंत, यश विभूते, शहाजी यादव, एस.के.स्वामी, बाळासाहेब घाटगे सतीश महिंद्रकर, नामा भोसले, श्रीनिवास गवंडी, लक्ष्मण बिराजदार, दत्ता माने, तानाजी पाटील, राजू पवार, रमेश हेगडे, प्रसाद हुल्ले, शरद भोसले, शिव स्वामी, अनिल बिराजदार, समर्थ घाटगे, रोहित कदम, राहुल गेजगे, पिंटू हळ्ळूरे, महांतेश स्वामी, समर्थ घाटगे, धनंजय निंबाळकर, समर्थ चव्हाण, विठ्ठल रेड्डी यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

चौकट:
७७ जणांना ३२ महिन्यात २ हजार २७५ किटचे वाटप -
 तालुक्यातील गोरगरीब कुस्तीगीरांसाठी न्यासाकडून प्रसाद रुपी खुराकाचे वाटप प्रती महिन्यास करण्यात येत आहे. या कीटमध्ये कुस्तीगीरांना आवश्यक तूप, बदाम, खारीक, बडीसोप, खसखस, इलायीची, धने आदि पदार्थांचे कुस्तीगरांसाठी श्रींचा प्रसाद रुपी खुराकात या जीनंसांचा समावेश आहे. प्रारंभी ७ महिने ५० जणांना त्यानंतर मागणी वाढत गेल्याने ७ महिन्यानंतर २७ पैलवान वाढल्याने आजतागायत ३२ महिन्यात २ हजार २७५ किटचे वाटप करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages