सासवड माळी शिक्षण संस्थेच्या व्हा.चेअरमनपदी डॉ. जाधव, सेक्रेटरीपदी बोरावके तर खजिनदारपदी पांढरे - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 16, 2026

सासवड माळी शिक्षण संस्थेच्या व्हा.चेअरमनपदी डॉ. जाधव, सेक्रेटरीपदी बोरावके तर खजिनदारपदी पांढरे

 सासवड माळी शिक्षण संस्थेच्या व्हा.चेअरमनपदी डॉ. जाधव, सेक्रेटरीपदी बोरावके तर खजिनदारपदी पांढरे




अकलूज (कटूसत्य वृत्त):- माळीनगर येथील दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटी या शिक्षण संस्थेच्या नूतन व्हाईस चेअरमनपदी डॉ.अविनाश राजाराम जाधव,नूतन सेक्रेटरीपदी रत्नदीप हनुमंत बोरावके व नूतन खजिनदारपदी कल्पेश उमेश पांढरे यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली.
               येथील दि सासवड माळी एज्युकेशन सोसायटीची सन २०२६-२७ ते २०२८-२९ या कालावधीसाठी नुकतीच संचालक मंडळाची निवडणूक घेण्यात आली होती.या निवडणुकीनंतर सोमवार दि.१२ ऑक्टोंबर २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता संस्थेच्या कार्यालयात संस्थेचे चेअरमन मोहन लांडे यांचे अध्यक्षतेखाली नूतन पदाधिकारी निवडीसाठी व विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी संस्थेच्या सर्व नूतन संचालक मंडळाची पहिली सभा घेण्यात आली.यावेळी नूतन संचालकांच्या झालेल्या सभेत संस्थेच्या व्हा.चेअरमनपदासाठी डॉ.अविनाश जाधव (भोंगळे), सेक्रेटरी पदासाठी रत्नदीप बोरावके व खजिनदार पदासाठी कल्पेश पांढरे यांच्या नावास सर्व उपस्थित संचालकांनी एकमताने पाठिंबा दिल्याने संस्थेच्या नूतन व्हा.चेअरमनपदी डॉ.अविनाश जाधव,नूतन सेक्रेटरीपदी रत्नदीप बोरावके व नूतन खजिनदारपदी कल्पेश पांढरे यांची एकमताने निवड झाली असल्याचे चेअरमन श्री.लांडे यांनी जाहीर केले.
           या निवडीनंतर संस्थेचे चेअरमन मोहन लांडे व सभासद हेमंत रासकर,विनय नवले,विनोद पांढरे,घनश्याम भोंगळे,गणेश बोरावके यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचा व नूतन संचालकांचा सत्कार केला तसेच दि मॉडेल विविधांगी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व शिक्षक,शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांचे वतीने नूतन व्हा.चेअरमन डॉ.अविनाश जाधव,नूतन सेक्रेटरी रत्नदीप बोरावके,नूतन खजिनदार कल्पेश पांढरे तसेच नूतन संचालक केतन बोरावके,विक्रांत कुदळे,प्रीतम राऊत,रोहित गिरमे,अजय गिरमे श्रीमती मंजुषाताई झगडे, स्नेहाताई गिरमे या सर्वांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी डॉ.अविनाश जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रशालेचे प्राचार्य कलाप्पा बिराजदार,उपप्राचार्य रितेश पांढरे,पर्यवेक्षक सुनील जवरे तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages