ईच्छा‎ भगवंताची‎ नवरात्र‎ महोत्सव‎ मंडळाचा‎ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २‎ लाख‎ ५१ हजारांचा‎ मदतीचा हात - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, October 16, 2026

ईच्छा‎ भगवंताची‎ नवरात्र‎ महोत्सव‎ मंडळाचा‎ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २‎ लाख‎ ५१ हजारांचा‎ मदतीचा हात

 ईच्छा‎ भगवंताची‎ नवरात्र‎ महोत्सव‎ मंडळाचा‎ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २‎ लाख‎ ५१ हजारांचा‎ मदतीचा हात


 




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्यातील‎ दुष्काळग्रस्त‎ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ईच्छा भगवंताची‎ नवरात्र महोत्सव मंडळाच्या‎ वतीने‎ २‎ लाख‎ ५१ हजार रुपयांचा धनादेश‎ जिल्हाधिकारी‎ एस.‎ कार्तिकेयन‎ यांच्याकडे सुपूर्द‎ करण्यात आला. महाराष्ट्राचे ग्रामविकास‎ मंत्री तथा सोलापूरचे‎ पालकमंत्री‎ जयकुमार भाऊ गोरे‎ यांच्या‎ ५१‎ व्या‎ वाढदिवसानिमित्त‎ हा सामाजिक‎ उपक्रम राबविण्यात‎ आला.‎ राज्यातील‎ दुष्काळी‎ परिस्थितीचे‎ गांभीर्य लक्षात‎ घेऊन पालकमंत्री जयकुमार भाऊ‎ गोरे यांनी‎ वाढदिवसानिमित्त‎ जाहिरातबाजी,‎ बॅनरबाजी आणि‎ अनावश्यक‎ खर्च टाळण्याचे‎ आवाहन‎ केले होते.‎ वाढदिवस‎ मोठ्या‎ प्रमाणात साजरा‎ करण्याऐवजी दुष्काळग्रस्त‎ शेतकऱ्यांच्या‎ मदतीसाठी पुढे‎ यावे, शेतकऱ्यांच्या पाठीशी‎ खंबीरपणे उभे‎ राहावे‎ आणि‎ मदतीच्या माध्यमातूनच वाढदिवसाच्या‎ शुभेच्छा‎ द्याव्यात, असे आवाहन त्यांनी‎ हितचिंतक व‎ कार्यकर्त्यांना‎ केले‎ होते. या‎ आवाहनाला‎ प्रतिसाद देत मंडळाने शेतकऱ्यांसाठी‎ मदतीचा हात‎ पुढे‎ केला. यावेळी आमदार सचिन दादा‎ कल्याणशेट्टी म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र‎ फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखालील‎ महायुती‎ सरकार‎ शेतकऱ्यांच्या पाठीशी‎ खंबीरपणे‎ उभे‎ आहे. दुष्काळग्रस्त‎ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी‎ ईच्छा‎ भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाने घेतलेला‎ पुढाकार‎ प्रेरणादायी असून, मंडळाचे‎ सामाजिक‎ कार्य कौतुकास्पद‎ आहे.‎ भाजपा नगरसेवक‎ किसन‎ जाधव‎ म्हणाले, राज्यात‎ दुष्काळी परिस्थिती‎ जाहीर‎ झाली असून महायुती‎ सरकार‎ शेतकऱ्यांच्या‎ मदतीसाठी‎ खंबीरपणे उभे आहे पालकमंत्री जयकुमार‎ भाऊ गोरे‎ यांनी वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्च‎ टाळून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना‎ मदत‎ करण्याचे आवाहन‎ केले‎ होते.‎ त्याला‎ प्रतिसाद देत‎ ईच्छा भगवंताची‎ परिवाराचे संस्थापक तथा‎ आधारस्तंभ लक्ष्मण‎ मामा‎ जाधव,‎ माजी‎ नगरसेवक नागेश अण्णा गायकवाड, नगरसेविका‎ सौ‎ अंबिका‎ नागेश अण्णा‎ गायकवाड, अॅड.‎ अनिल जाधव‎ यांच्या मार्गदर्शनाने‎ आणि सोलापूर‎ शहर‎ मध्यचे‎ दमदार युवा आमदार देवेंद्रदादा कोठे यांच्या‎ प्रेरणादायी नेतृत्वाने, पाणीदार‎ आमदार सचिन दादा‎ कल्याणशेट्टी‎ यांच्या उपस्थितीत‎ शेतकऱ्यांसाठी‎ २‎ लाख‎ ५१ हजार रुपयांचा‎ धनादेश‎ सुपूर्द‎ केला. याप्रसंगी‎ महापौर‎ विनायकदादा‎ कोंड्याल,‎ भाजपा शहर‎ जिल्हाध्यक्ष शशिकांत‎ नाना चव्हाण,‎ नगरसेविका सौ चैत्रालीताई शिवराज‎ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते शिवराज गायकवाड,‎ युवा‎ नेते चेतन नागेश‎ अण्णा गायकवाड आदींची‎ उपस्थिती होती. ईच्छा‎ भगवंताची‎ नवरात्र महोत्सव मंडळाचा हा उपक्रम‎ शेतकऱ्यांना दिलासा‎ देणारा आहे.‎ दरम्यान, पालकमंत्री‎ जयकुमार‎ भाऊ‎ गोरे‎ यांना‎ दीर्घायुष्य लाभावे‎ आणि‎ राज्यातील‎ दुष्काळी परिस्थितीचे लवकरात‎ लवकर निवारण‎ व्हावे, यासाठी‎ किसन जाधव‎ यांनी‎ सोलापूरची ग्रामदैवता कुलस्वामिनी श्री‎ रूपाभवानी‎ मंदिरात अभिषेक‎ व महाआरती करून देवीचरणी‎ साकडे‎ घातले. याप्रसंगी नगरसेविका‎ सौ.चैत्राली ताई शिवराज‎ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते‎ शिवराज गायकवाड, श्रीकांत‎ गिड्डे, वसंत‎ कांबळे, माणिक‎ कांबळे,‎ महादेव‎ राठोड,‎ सागर‎ गायकवाड, संजय‎ राजपूत,‎ नागराज गायकवाड, यल्लाप्पा‎ शिवपुरे‎ आदींची‎ उपस्थिती‎ होती‎ यावेळी‎ किसन जाधव‎ यांनी राज्यात‎ सुख-शांती‎ नांदावी आणि शेतकऱ्यांवरील‎ संकट‎ दूर व्हावे,‎ अशी प्रार्थनाही‎ त्यांनी‎ केली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages