सोलापूरच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी महापालिकेची नसून प्रत्येक नागरिकाची- सी. ए. जवळकर - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, September 1, 2026

सोलापूरच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी महापालिकेची नसून प्रत्येक नागरिकाची- सी. ए. जवळकर

 सोलापूरच्या सर्वांगीण विकासाची जबाबदारी महापालिकेची नसून प्रत्येक नागरिकाची- सी. ए. जवळकर






सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूरचा सर्वांगीण विकास ही केवळ शासन किंवा महानगरपालिकेचे जबाबदारी नसून शहरातील प्रत्येक नागरिक उद्योजक आणि सामाजिक संस्थेची सामूहिक जबाबदारी आहे असे प्रतिपादन चित्राज् सिटी साईड रिसॉर्टचे मालक तथा उद्योजक धीरज जवळकर यांनी केले.

ते पुढे बोलताना म्हणाले की सोलापूर शहराला ऐतिहासिक धार्मिक औद्योगिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. या वैशिष्ट्यांचा योग्य उपयोग करून सोलापूरला राज्यतील एक प्रमुख पर्यटन आणि व्यावसायिक केंद्र म्हणून विकसित करता येऊ शकते. त्यासाठी प्रशासन, उद्योजक, व्यापारी, सामाजिक संस्था आणि सजग नागरिकांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

शहराचा विकास म्हणजे केवळ रस्ते, पूल आणि मोठ्या इमारती उभारणे नव्हे तर स्वच्छता, हरित परिसर, दर्जेदार शिक्षण, आरोग्य सुविधा, सुरक्षित वाहतूक, पर्यटन वृद्धी आणि रोजगार निर्मिती या सर्व बाबी विकासाशी निगडित आहेत. प्रत्येकाने शहराप्रती आपली जबाबदारी ओळखली तर सोलापूरच्या प्रगतीला निश्चितच नवी गती मिळेल. अशी मला आशा वाटते.

*पर्यटन आणि रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न* 

अ) सोलापूरच्या पर्यटन क्षेत्राला चालना देण्याच्या उद्देशाने चित्राज् सिटी साईड रिसॉर्ट कार्यरत आहे. शहराच्या परिसरात पर्यटकांना दर्जेदार निवास, मनोरंजन आणि कौटुंबिक पर्यटनाच्या सुविधा उपलब्ध करून देतानाच स्थानिक युवकासाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे काम रिसॉर्टच्या माध्यमातून केले जात आहे.

*ब) चित्राज् सिटी साईड रिसॉर्ट मध्ये शंभर खोल्या, भव्य बँक्वेट हॉल, 40 हजार चौरस फुटांचे प्रशस्त लॉन, वॉटर पार्क, अडवेंचर पार्क, क्रिकेटर टर्फ, व्ही.आर.गेम्स शाकाहारी रेस्टॉरंट आणि मीटिंग रूम अशा विविध सुविधा उभारण्यात आल्या आहेत त्यामुळे सोलापूर आणि परिसरातील नागरिकांना विवाह सोहळे कौटुंबिक कार्यक्रम व्यावसायिक बैठका आणि पर्यटनासाठी एक सर्वसमावेशक ठिकाण उपलब्ध झाले असल्याची भावना सोलापुरात निर्माण झाली आहे.*

क) सोलापूरच्या पर्यटन विकासात आपलाही वाटा असावा या भावनेतून चित्राज् सिटी साईड रिसॉर्ट कार्य करीत आहे. बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना चांगल्या सुविधा देणे, सोलापूरची सकारात्मक ओळख निर्माण करणे, आणि स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. असे धीरज जवळकर यांनी सांगितले.

ड) सोलापूर परिसरात धार्मिक पर्यटना बरोबरच कौटुंबिक, कृषी, सांस्कृतिक आणि व्यावसायिक पर्यटनाला मोठी संधी आहे. शहरातील पर्यटन स्थळांचा प्रभावी प्रचार, परिसराचे सुशोभीकरण, स्वच्छतेचे नियोजन आणि पर्यटकांना उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळू शकते. असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

इ) माझे शहर - माझी जबाबदारी ही भावना प्रत्येक सोलापूरकराने मनात रुजवली पाहिजे. प्रत्येक उद्योग आणि व्यावसायिक संस्थेने शहराच्या विकासासाठी आणि स्थानिक रोजगार निर्मितीसाठी योगदान दिल्यास सोलापूर लवकरच एक स्वच्छ, सुंदर, हरित आणि पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक शहर म्हणून नावारूपाला येईलच, असा ठाम विश्वासही जवळकर यांनी व्यक्त केला.

*ई ) चित्राज् सिटी साईड रिसॉर्ट च्या माध्यमातून सोलापूरच्या आदरातिथ्य आणि पर्यटन क्षेत्राला आधुनिक स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जात आहे.* पर्यटक तसेच स्थानिक नागरिकांना एकाच ठिकाणी निवास भोजन, मनोरंजन, कौटुंबिक कार्यक्रम आणि व्यावसायिक बैठकांच्या दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रिसॉर्ट मध्ये आयोजित होणाऱ्या विविध कार्यक्रमामुळे स्थानिक मंडप व्यावसायिक, डेकोरेटर्स, छायाचित्रकार, कलाकार, वाहतूकदार आणि इतर छोट्या उद्योजकांनाही व्यवसायाच्या नव्या संधी उपलब्ध होत आहेत.

उ) सोलापूरचा विकास साधायचा असेल तर स्थानिक नागरिकांनी स्थानिक उद्योजक व्यावसायिक आणि पर्यटन स्थळांना प्राधान्य दिले पाहिजे शहरात येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला चांगली सेवा आणि सोलापूरच्या पाहुणचाराचा आनंददायी अनुभव मिळाला पाहिजे तरच पर्यटक शहराचा सदिच्छा दूत बनेल असे मला विश्वासाने,अनुभवाने आणि विश्वासाने वाटते. चित्राज सिटी साईड रिसॉर्ट च्या माध्यमातून सोलापूरची सकारात्मक ओळख राज्यभर पोहोचविण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत असे धीरज जवळकर यांनी सांगितले. या सर्व सुविधा उपलब्ध होण्यासाठी सोलापूर शहर व परिसरातील नागरिकांनी 89 560 33 100, 89 560 33 101, 105, अष्टयात्तर 87 87 75 63 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन जवळकर परिवारातर्फे करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages