हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या १५०१ व्या जयंतीनिमित्त सेवाभावातून सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम
हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या १५०१ व्या जयंतीनिमित्त उम्मीद सोशल फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या हिजामा कॅम्प (Cupping Therapy) या आगळ्या वेगळ्या आरोग्यविषयक उपक्रम आयोजित करण्यात आला
उम्मीद सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. मुझम्मिल भाई तांबोळी व उपाध्यक्ष मा. शोएब भाई बेद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली हा हिजामा कॅम्प यशस्वीपणे पार पडला. त्यांच्या नेतृत्वातून आरोग्यसेवा, सामाजिक बांधिलकी आणि समाजातील गरजू घटकांसाठी काम करण्याची सकारात्मक दिशा निश्चितच कौतुकास्पद आहे.
या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून युवा नेते मा.प्रणव परिचारक, उपनगराध्यक्ष मा.महादेव धोत्रे व आजी माजी नगरसेवक, समाजसेवक यांच्या उपस्थिती लाभली
समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात सहभागी होणे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणे आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून एकजूट. बंधुभाव व सामाजिक सलोखा अधिक मजबूत करणे. हीच खरी लोकसेवेची भावना आहे. असे समजून उम्मीद सोशल फाउंडेशन काम करत आहे.
यावेळी सोनू तांबोळी. हासिम बेद्रेकर. जुनेद बेद्रेकर, मतिन पटेल. कैफ बेद्रेकर. शाहरुख मुलाणी. वसीम तांबोळी. सलीम मुलाणी. रेहान बेद्रेकर. फिरोज मुलाणी व अनेक सहकार्याने कार्यक्रमात योगदान दिले;


No comments:
Post a Comment