विश्वशांती गुरुकुलमध्ये 'माईर्स एमआयटीचा' स्थापना दिन उत्साहात साजरा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 6, 2026

विश्वशांती गुरुकुलमध्ये 'माईर्स एमआयटीचा' स्थापना दिन उत्साहात साजरा

 विश्वशांती गुरुकुलमध्ये 'माईर्स एमआयटीचा' स्थापना दिन उत्साहात साजरा  




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूलमध्ये 'माईर्स' संस्थेचा ४४ वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ. दा. कराड यांनी माईर्स एमआयटी शिक्षण समूहाची स्थापना ०५ ऑगस्ट १९८३ रोजी कोथरूड, पुणे येथे केली. आज या संस्थेचा वटवृक्ष शाळा, महाविद्यालये आणि पाच विद्यापीठांसह देशभरात विस्तारित झाला आहे. यावेळी संस्थेच्या चार दशकांहून अधिक काळाच्या गौरवशाली शैक्षणिक वाटचालीला उजाळा देणारा माहितीपट प्रदर्शित करण्यात आला. संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ. दा. कराड यांचे दूरदर्शी कार्य, संस्थेच्या प्रवासातील उल्लेखनीय टप्पे, विविध क्षेत्रांतील योगदान आणि भविष्यातील ध्येय यांचे प्रभावी दर्शन या माहितीपटातून घडले.

स्थापना दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सत्य, शिस्त, करुणा, उत्कृष्टता, नावीन्य, शांतता आणि समाजसेवा या जीवनमूल्यांचे पालन करण्याची प्रतिज्ञा घेतली. याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका रूपाली हजारे यांनी एमआयटी विश्वशांती गुरुकुलचा समृद्ध वारसा आणि मूल्याधारित शैक्षणिक परंपरेविषयी बोलताना ज्ञानासोबतच जबाबदार आणि संवेदनशील विद्यार्थी घडविण्याचे कार्य संस्था करत असल्याचे सांगितले. शाळेच्या समन्वयिका नमिता अथणीकर यांनी एमआयटी परिवारातील आपल्या अनुभवांना उजाळा देत शिस्त, समर्पण, प्रामाणिकपणा आणि सामाजिक बांधिलकी हीच संस्थेची खरी ओळख असल्याचे सांगितले.

यानंतर विद्यार्थी प्रतिनिधींनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थापक, व्यवस्थापन, शिक्षक आणि पालक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. संस्थेच्या समृद्ध परंपरेचा वारसा जपत गुणवत्तापूर्ण व मूल्याधिष्ठित शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि जागतिक दर्जाच्या शिक्षणाची परंपरा अधिक दृढ करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages