सुनेत्रा पवार यांच्यावरील वक्तव्याचा मोहोळ येथे राष्ट्रवादीचे निषेध आंदोलन
यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या छायाचित्रास जोडे मारून आंदोलनकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संबंधित वक्तव्याचा तीव्र निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली.
या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सुमित पवार, महिला तालुकाध्यक्ष प्रज्ञाताई बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष सौदागर बाबर, शहर कार्याध्यक्ष साजिद हुडेकरी, सुनील चव्हाण, वैशाली बनसोडे, लतिका बनसोडे,गणेश टेळे, भैय्या सोलांनकर, सोनू पवार यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा वहिनी पवार यांच्याबाबत करण्यात आलेले वक्तव्य हे अत्यंत अयोग्य व महिलांचा अवमान करणारे असल्याचे सांगत अशा प्रकारच्या वक्तव्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र शब्दांत निषेध करत असल्याचे स्पष्ट केले.
.png)
No comments:
Post a Comment