एन. बी. नवले सिंहगडचे विद्यार्थी देशातील नामांकित कंपन्यांत झळकले - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 7, 2026

एन. बी. नवले सिंहगडचे विद्यार्थी देशातील नामांकित कंपन्यांत झळकले

 एन. बी. नवले सिंहगडचे विद्यार्थी देशातील नामांकित कंपन्यांत झळकले





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव-सोलापूरने यंदाच्या प्लेसमेंट हंगामात उल्लेखनीय यश संपादन करत उद्योगविश्वात आपल्या गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रभावी छाप पाडली आहे. विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची निवड केली असून २०२४-२५ आणि २०२५-२६ या दोन शैक्षणिक वर्षांत एकूण २३३ विद्यार्थ्यांना प्लेसमेंट, तर २४८ विद्यार्थ्यांना इंटर्नशिपच्या संधी मिळाल्या आहेत.

यंदाच्या प्लेसमेंटमध्ये कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागातील कीर्तन करवा याने दुबईस्थित कन्सिस्टंट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स एलएलसी (अभियांत्रिकी सल्लागार कंपनी) या आंतरराष्ट्रीय कंपनीत ऑटोमेशन इंजिनिअर  पदासाठी वार्षिक १८.५५ लाख रुपयांच्या आकर्षक पॅकेजसह ऑफर मिळवत महाविद्यालयातील सर्वोच्च प्लेसमेंटचा मान पटकावला आहे.

तसेच विशाल मोटे याची NICE या जागतिक तंत्रज्ञान कंपनीमध्ये ७.५ लाख रुपयांच्या वार्षिक पॅकेजवर निवड झाली असून, ओंकार सुरवसे याने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये ६ लाख रुपयांच्या पॅकेजसह यश संपादन केले आहे. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग विभागातील संजना टाळकोकुळ हिची रॉकवेल ऑटोमेशन मध्ये ६.५ लाख रुपयांच्या पॅकेजवर निवड झाली असून, विविध विभागांतील अनेक विद्यार्थ्यांनी पियाजिओ व्हेईकल्स, व्हील्स इंडिया, डॅनफॉस पॉवर सोल्यूशन्स आणि इन्फोटेक सोल्यूशन्स यांसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांची निवड झाली. सिंहगड महाविद्यालयाची यशस्वी परंपरा कायम राखली आहे.

महाविद्यालयाच्या प्लेसमेंट आकडेवारीनुसार यांत्रिकी अभियांत्रिकी विभागातील ६५, ई&टीसी विभागातील ७४, इलेक्ट्रिकल विभागातील ४४, कॉम्प्युटर सायन्स विभागातील ४१ आणि सिव्हिल विभागातील ९ विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. याशिवाय विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रातील प्रत्यक्ष अनुभव मिळावा यासाठी २४८ विद्यार्थ्यांना इंटर्नशिप उपलब्ध करून देण्यात आली.

महाविद्यालयातील अत्याधुनिक प्रयोगशाळा, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम, व्यक्तिमत्त्व विकास, तांत्रिक कौशल्यवृद्धी, मॉक इंटरव्ह्यू, अप्टिट्यूड प्रशिक्षण आणि प्लेसमेंट सेलचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये करिअरच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध होत असल्याचे महाविद्यालयाने सांगितले.

महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे सहसचिव तथा कॅम्पस डायरेक्टर संजय नवले, डॉ शंकर नवले, उपप्राचार्य डॉ रवींद्र व्यवहारे, प्लेसमेंट ऑफिसर प्रा. विकास मराठे, प्रा. शशिकांत हिप्परगी,  विभागप्रमुख, प्राध्यापक आणि प्लेसमेंट विभागाने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages