मराठा सेवा संघातर्फे व्ही.व्ही.पी. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 7, 2026

मराठा सेवा संघातर्फे व्ही.व्ही.पी. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

 मराठा सेवा संघातर्फे व्ही.व्ही.पी. इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार





सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मराठा सेवा संघाच्या वतीने व्ही.व्ही.पी. इंजिनिअरिंग कॉलेज येथे दहावी व बारावी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी सूर्यकांत पाटील ( शहराध्यक्ष म .से.संघ )यांनी प्रास्ताविक करताना मराठा सेवा संघातर्फे दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला जात असल्याचे सांगितले. दहावी-बारावी हा विद्यार्थ्यांच्या यशाचा पहिला टप्पा असून चारित्र्य संवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डी.एम कमळे कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटचे संचालक अभिजीत जवळकोटे यांनी दहावी-बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगून कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्य यांच्या जोरावर यश निश्चित मिळते, असा विश्वास व्यक्त केला.
व्ही.व्ही.पी. पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. एस. एन. कुलकर्णी यांनी चांगले संस्कार व सकारात्मक विचार यांच्या बळावर कोणतेही ध्येय गाठता येते, असे सांगत तंत्रशिक्षणाचे वाढते महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. व्ही.व्ही.पी. इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. ए. एन. गायकवाड यांनी शिक्षण क्षेत्रातील बदल, ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध होत असलेल्या शैक्षणिक संधी आणि तंत्रशिक्षणामुळे रोजगाराच्या वाढत्या संधी याबाबत मार्गदर्शन केले. शिवमती उज्वला साळुंखे (जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड सोलापूर)यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाची कास धरून मोठी स्वप्ने पाहा, प्रगती करा आणि समाजासाठी प्रेरणादायी कार्य करा, असा संदेश दिला.
मराठा सेवा संघाचे अध्यक्ष व व्हि. व्हि पी संस्थापक चेअरमन डॉ. जी. के. देशमुख यांनी संघाच्या सामाजिक व शैक्षणिक कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांनी स्वतःची क्षमता आणि आवड ओळखून योग्य करिअरची निवड करावी, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संतोष माने यांनी केले, तर आभार विकास भांगे यांनी मानले. या प्रसंगी व्हि.व्हि.पी. संस्थेचे अध्यक्ष श्री. अमोल (नाना) चव्हाण , व्हाइस चेअरमन मधुकर कटकधोंड प्रा. लक्ष्मण महाडिक, जीवन यादव, प्रकाश ननवरे, आर. पी. पाटील, हनुमंत पवार, परशुराम पवार, सचिन चव्हाण, अंबादास सपकाळे, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages