डॉ.धवलसिंहाचा बलराज अश्व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी देहूकडे रवाना - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 7, 2026

डॉ.धवलसिंहाचा बलराज अश्व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी देहूकडे रवाना

 डॉ.धवलसिंहाचा बलराज अश्व संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी देहूकडे रवाना





अकलूज (कटूसत्य वृत्त):- डॉ. धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांचा बलराज अश्व, जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी देहूकडे रवाना करण्यात आला.डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या प्रतापगड येथील निवासस्थानी, बलराज अश्वाची पूजा करण्यात आली.यावेळी डॉ. धवलसिंह मोहिते पाटील, उर्वशीराजे धवलसिंह मोहिते पाटील व पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी बलराज अश्वाचे पूजन केले. यावेळी भाविकांनी ज्ञानोबा तुकाराम म्हणत, टाळ मृदंगांच्या गजरात  बलराज या आश्वाला मार्गस्थ केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. 
      यावेळी बोलताना डॉ. धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले की सालाबाद प्रमाणे, वर्षानुवर्ष आश्वसेवेच्या माध्यमातून, भक्ती भावाने, आमचे वडील कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांनी अश्व सेवेची परंपरा सुरू केली.ही परंपरा माझ्या कुटुंबाच्या माध्यमातून चालू आहे. अतिशय भावनिक क्षण  हा आमच्यासाठी असतो, कारण जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आश्वाच्या माध्यमातून, सेवा आमच्या कुटुंबाच्या वतीने घडते. जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे रिंगण हे अकलूज मध्ये होते. बलराज अश्वने अनेक वाऱ्या पालखीच्या केल्या आहेत. तो चांगल्या पद्धतीने रिंगण सोहळा पार पाडतो. बलराज अश्व हा मारवाड जातीचा घोडा असून, तो साडेसात वर्षाचा असल्याचे डॉ.धवलसिंह मोहिते पाटील म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages